पेट्रोल, डिझेल वाहनांची खरेदी रोडावली! मुंबईची काय आहे आकडेवारी?

74

सध्या इंधन दरवाढ होत आहे, त्यामुळे मोटार व्यवसायात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. २०१९ पासून मुंबईत डिझेलच्या वाहनांची नोंदणी ६६ टक्के कमी झाली, तर पेट्रोलच्या वाहनांची नोंदणी ३६ टक्के इतकी कमी झाली आहे.

कोरोनाचा फटका!

मागील दीड वर्षांचा कालखंड हा कोरोना महामारीचा होता, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ होत गेली. या सगळ्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची विक्री घटली. तसेच कंपन्यांनीही उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे आता सीएनजीच्या वाहनांकडे कल वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. ती वाहने परवडणारी आहेत. म्हणून त्यांची विक्री वाढू लागली आहे.

(हेही वाचा आनंदाची बातमी! गायी पाळा, फुकट वीज मिळवा!)

बॅटरीवरील वाहनांच्या भरमसाठ किमती 

पर्यावरणपूरक वाहने म्हणून बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात आली आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे ती सर्वसाधारण नागरिकांना परवडत नाहीत, तरीही या वाहनांची विक्री वाढत असली तरी तितक्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे त्यांचे उत्पादनही वाढत नाही. म्हणून या वाहनांच्या निर्मिती उद्योगाला म्हणावा तितका वेग येत नाही. २०१९-२० यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ६७२ वाहनांची मुंबईत नोंदणी झाली, तर २०२०-२१ मध्ये १,४४२ वाहनांची नोंद झाली.

परिवहन विभागाची आकडेवारी काय सांगते?

  • डिझेल वाहने      २०१९-२०    ३०,४४० (वाहनांची नोंदणी)
    २०२०-२१   ११,७८५
  • पेट्रोल वाहने     २०१९-२०    १,८९, ४५२
    २०२०-२१    १, ४३, ४०८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.