Bogus Doctors : बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहिम राबवणार; हसन मुश्रीफ यांची माहिती

बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, मुश्रीफ यांनी सांगितले.

196
Bogus Doctors : बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहिम राबवणार; हसन मुश्रीफ यांची माहिती
Bogus Doctors : बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहिम राबवणार; हसन मुश्रीफ यांची माहिती

बनावट वैद्यकीय पदवीच्या आधारे राज्यात व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात (Bogus Doctors) धडक मोहिम राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुधवारी (१९ डिसेंबर) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. बोगस डॉक्टर (Bogus Doctors) शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला बोगस डॉक्टरांविरोधात (Bogus Doctors) कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. (Bogus Doctors)

मुंबईत बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेल्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याबाबत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न विचारला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी परदेशात वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला भारतात वैद्यकीय सेवा करण्यासाठी भारतीय वैद्यक परिषदेची परिक्षा द्यावी लागते, अशी माहिती दिली. या केंद्रीय परिक्षेनंतर एक वर्षाची आंतरवासिता (Internship) करावी लागते. त्यानंतर त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. (Bogus Doctors)

(हेही वाचा – Ajay Piramal : पारंपरिक उद्योगाचा परिश्रमपूर्वक विस्तार करणारे पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल)

सीबीआयच्या शोध मोहिमेत २३ बोगस डॉक्टर 

सन २०२२-२३ मध्ये सीबीआयने घेतलेल्या शोध मोहिमेत देशभरात एकूण २३ बोगस डॉक्टर (Bogus Doctors) आढळले. यापैकी ३ जण महाराष्ट्रातील होते. परदेशी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने (Central Govt) नियम तयार केले आहेत. या नियमानुसार विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. मात्र कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड आणि युनायटेड किंग्डम या देशातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची गरज नाही, असेही मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे प्रताप सरनाईक, उद्धव ठाकरे गटाच्या अजय चौधरी, रवींद्र वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांनी उपप्रश्न विचारले. (Bogus Doctors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.