TOLL EXEMPTION : गणेशोत्सव टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे झाले कट

प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण

100
TOLL EXEMPTION : गणेशोत्सव टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे झाले कट
TOLL EXEMPTION : गणेशोत्सव टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे झाले कट

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2023) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी (TOLL EXEMPTION) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आला होती. शुक्रवारपासूनच प्रवाशांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.टोलमाफी असतानाही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेली त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून टोलमाफी कशी मिळणार याबाबतची माहिती टोलमाफीच्या घोषणेत नसल्यामुळे टोलनाक्यावर पोहोचलेल्यांचे पैसे कापले गेले आहे. मात्र असे कसे झाले असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत होता.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफीचा पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे पास असूनही फास्टॅगमधून पैसे कापले जात असल्याचे अनेकांनी सांगितले.परंतु टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून टोलमाफी कशी मिळणार याबाबतची माहिती टोलमाफीच्या घोषणेत नसल्यामुळे टोलनाक्यावर पोहोचलेल्या अनेक गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेली असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मागील काही वर्षांपासून गणेशभक्तांना टोलमाफी दिली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही टोलमाफीची घोषणा करण्यात आली. राज्यातील टोलनाक्यांवर आता पूर्वीप्रमाणे रोख पैसे घेऊन टोल वसूल केला जात नाही. टोलवसुलीसाठी वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले आहेत. वाहन टोलनाक्यावर उभे राहिले की, फास्टॅग स्कॅन होऊन अवघ्या काही सेकंदात टोलची रक्कम कापली जाते. नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होऊन बराच अवधी उलटला आहे.

(हेही वाचा : Footpaths Became Hawker Paths : बोरिवली पश्चिम येथे फूटपाथ बनले फेरीवाले पाथ; पादचाऱ्यांना चालणेही अशक्य; वाहतूक कोंडीने मनस्ताप )

टोलमाफीसाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, आरटीओ आदींकडून पास मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. टोलमाफीचा पास मिळणे अत्यंत सोपे असले, तरी प्रत्यक्ष टोलनाक्यावर टोलमाफी मिळवणे अवघड आहे. शुक्रवारपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पासधारकांसाठी ठेवल्याचे सांगितले जाते. परंतु या मार्गिकेवर सदैव अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे, वाहनचालक नेहमीप्रमाणे चारचाकी वाहनांच्या रांगेत जातात. या रांगेतून पुढे गेल्यावर टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन करून अवघ्या काही सेकंदात पैसे कापून घेतले जातात. त्यामुळे पास दाखवायच्या आतच टोल कापला जातो. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांचा गोंधळ उडत आहे. टोलमाफी कोणत्या मार्गिकेवर आहे, याबाबत टोलनाक्यापूर्वी जनजागृती केलेली नाही. त्यामुळे टोलमाफीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात टोलमाफी प्राप्त करणे गैरसोयीचे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र हे कापलेले पैसे परत मिळणार का असाच सवाल प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.