CJI On Legal Profession : वकिली व्यवसाय फुलणार की संपणार हे वकिलांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून; भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड

19
CJI On Legal Profession : वकिली व्यवसाय फुलणार की संपणार हे वकिलांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून; भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड
CJI On Legal Profession : वकिली व्यवसाय फुलणार की संपणार हे वकिलांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून; भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड

प्रामाणिकपणा हा कायदेशीर व्यवसायाचा मुख्य आधारस्तंभ आहे. (CJI On Legal Profession) जे वादळाने मिटत नाही, ते छोट्या-छोट्या सवलती आणि तडजोडींने मिटते जे, काही वेळा वकील आणि न्यायाधीश त्यांच्या ग्राहकांना देतात. आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो, पण स्वतःला नाही. वकील स्वतःची आपली सचोटी कशी राखतात, यावर त्यांचा कायदेशीर व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल हे अवलंबून असते, असे उद्गार भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी काढले.  संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिल संघातर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड बोलत होते. या वेळी न्यायमूर्ती अभय ओक, दीपंकर दत्त, देवेंद्र कुमार उपाध्याय, पी.व्ही. वराळे, एस.व्ही. गंगापूरवाला, आर. व्ही. घुगे, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, वकील संघटनेचे अध्यक्ष एन.सी. जाधव आणि सचिव आर.के. इंगोले उपस्थित होते.

(हेही वाचा – Importance Of Cow : गोमातेचे महत्त्व समाजाला पटवून देणे आवश्यक; अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराज)

सरन्यायाधीश पुढे म्हणाले, ”आपण सर्वजण आपल्या विवेकासह झोपतो. रोज रात्री प्रश्न असतात की, आपण एकतर सचोटीने जगू किंवा स्वत:चा नाश करू. वकिलांना तेव्हा सन्मान मिळतो, जेव्हा ते न्यायाधीशांचा आदर करतात आणि न्यायाधीश जेव्हा वकिलांचा आदर करतात, तेव्हा त्यांना सन्मान मिळतो. जेव्हा दोघांना वाटते की दोघेही न्यायाच्या एकाच चाकाचे भाग आहेत, तेव्हा असे घडते.” (CJI On Legal Profession)

‘जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, तेव्हा इतरांना मदत करा. तुम्ही कोणत्या प्रकारचे वकील झाला, हे महत्त्वाचे नाही, व्यवसाय अधिक लवचिक बनविण्यात मदत करा’, असे आवाहन त्यांनी येथे उपस्थित असलेल्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना केले. (CJI On Legal Profession)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.