Department of Meteorology: उष्णतेची झळ बसत असूनही महाराष्ट्रातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता, तज्ज्ञांनी सांगितले कारण; जाणून घ्या…

130
Weather Department: मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुण्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस; हवामान खात्याचा इशारा

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नव्याने सक्रीय होणाऱ्या वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर परिणाम होऊन महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Department of Meteorology)

महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाची शक्यता…
पुढील २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर इतर ठिकाणी तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. भंडारा, हिंगोली, नाशिक, नागपूरमध्ये (Bhandara, Hingoli, Nashik, Nagpur) शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे पुणे, ठाणे आणि मुंबईत उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा –Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचार पडणार महागात; मोठी कारवाई होणार )

हळद, ज्वारीसह अन्य भाजीपाला पिकांचे नुकसान
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार स्वरुपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या वसमतकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसाने शेतातील हळद, ज्वारी यासह भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय?
वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय असतं, याबाबत हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा देशातलं हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन आणि लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा असेल, त्याच दिशेला हा डिस्टर्बन्स निर्माण होतो. ही दिशा समजून घेऊन, हवामानशास्त्रज्ञ वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवतात.उन्हाळ्यातल्या पावसासाठी दक्षिणेकडून येणारे वारे कारणीभूत असतात. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाची कारणंही वेगळी असतात. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मुसळधार पाऊस पडतो. त्याचा थेट परिणाम पिकांवर होतो. भूस्खलन, पूर आणि हिमस्खलनाच्या घटना घडू शकतात. तसंच यामुळे थंडीची लाट येऊ शकते. दाट धुकंही पडू शकतं. अनेक दिवस ही स्थिती राहू शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.