Deonar Tanaji Malusare Junction : ‘त्या’ जागेत उभे राहणार महिला कर्मचाऱ्यांसाठी निवारा केंद्र, वृध्दाश्रम

देवनार परिसरातील तानाजी मालुसरे चौकातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच महानगरपालिकेच्या 'एम पूर्व' विभागामार्फत करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे २०० अनधिकृत बांधकामे तथा अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

461
BMC : मुंबई महापालिका आणखी २५०० संगणकांची करणार खरेदी

मुंबई महापालिका प्रशासनाने (Mumbai Municipal Administration) जर मनात आणले तर कोणतेही अनधिकृत बांधकाम ते तोडू शकतात आणि मनात नसेल तर अनधिकृत बांधकामांवर वर्षांनुवर्षे कानाडोळा करत त्यांना  शासकीय नियमांनुसार पात्र होण्यास मदत करतात. महापालिकेने आता असे मनात आणत देवनार परिसरातील तानाजी मालुसरे चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून हे दाखवून दिले. याच झोपड्यांवर सन २०१५ पासून २०२० पर्यंत पाच वेळा कारवाई करण्यात आली होती. परंतु सन २०२० नंतर दुर्लक्ष केलेल्या प्रशासनाला आता या भूखंडावरील आरक्षित बांधकामाची आठवण झाल्यानंतर येथील सर्व बांधकामे जमिनदोस्त केली आहे. (Deonar Tanaji Malusare Junction)

देवनार परिसरातील तानाजी मालुसरे चौकातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागामार्फत करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे २०० अनधिकृत बांधकामे तथा अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. सन २०१५, सन २०१६, सन २०१७ मध्ये २ वेळा आणि सन २०२० मध्ये; यानुसार गेल्या काही वर्षात एकूण ५ वेळा सदर भूखंडावरील अनधिकृत कच्ची बांधकामे हटविण्यात आली आहेत नोटीस देण्यासह आवश्यक ती प्रक्रिया राबविल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. (Deonar Tanaji Malusare Junction)

(हेही वाचा – President Droupadi Murmu : यांनी केले आदिवासी समुदायाच्या जीवनचक्राचे कौतुक)

यामुळे येत होता कामे करण्यास अडथळा

देवनार येथील तानाजी मालुसरे चौकाजवळ असलेला हा आरक्षित भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारित आहे. या भूखंडावर महिला कर्मचाऱ्यांसाठी निवारा केंद्र, काळजी केंद्र, वृद्धाश्रम, आधार केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र अशी विविध आरक्षणे आहेत. नागरी सेवा-सुविधांच्या दृष्टीकोनातून याठिकाणी आरक्षित असलेल्या बाबींच्या अनुरूप विकास कामे राबविणे बंधनकारक आहे. परंतु या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे तसेच अतिक्रमणांमुळे या  जागेवर आवश्यक ती सेवा-सुविधा बाबतची कामे करण्यास अडथळा येत होता. त्यामुळे या भूखंडावर असलेली तात्पुरत्या स्वरूपाची कच्ची अनधिकृत बांधकामेही ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करून हटविण्यात आली आहेत. (Deonar Tanaji Malusare Junction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.