Municipal Union Demand : निवडणूक कामासाठी सेवा निवृत्त आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना घेण्याची म्युनिसिपल युनियनची मागणी

निवडणूक कामासाठी सेवानिवृत्त आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जावी अशी मागणी केली आहे.

205
Municipal Union Demand : निवडणूक कामासाठी सेवा निवृत्त आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना घेण्याची म्युनिसिपल युनियनची मागणी
Municipal Union Demand : निवडणूक कामासाठी सेवा निवृत्त आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना घेण्याची म्युनिसिपल युनियनची मागणी

निवडणूक आयोगाच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेश काढले जात असून आधीच महापालिकेत कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असताना त्यात निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्ती करण्याच्या आयोगाच्या निर्देशामुळे महापालिकेच्या कामावर प्रचंड ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेतील कामगार कर्मचारी संघटनेने निवडणूक कामासाठी सेवानिवृत्त आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जावी अशी मागणी केली आहे.

दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देत ही मागणी केली. या निवेदनात बने यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापना अनुसूचीवर १ लाख ४५ हजारहून जास्त पदे आहेत. महापालिकेच्या पटावर सध्या फक्त ९२ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत, म्हणजेच सद्यकाळात महापालिकेच्या विविध संवर्गाची अंदाजे ५३ हजार पदे रिक्त आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विविध कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी वर्षांनुवर्षे पाठविण्यात येते. त्यामुळे कार्यरत असलेल्या अल्प कर्मचारी बळावर कामाचा प्रचंड ताण येतो असे म्हटले आहे.

(हेही वाचा – Indian Cricket Team : विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची तंदुरुस्ती चाचणी)

याबाबत त्यांनी विनंती वजा सूचना करताना, मुंबई महानगरपालिकेच्या सद्य कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी न करता, सेवानिवृत्त झालेल्या व इच्छुक असलेल्या महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी मुंबई महापालिकेकडून करण्यात यावी. २. मुंबई महानगरपालिकेतील सह कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचीच नेमणूक करण्याचा निर्णय झाल्यास, निवडणूक आयोगाच्या संदर्भित पत्रातील परिच्छेद क्र. १.२ आणि १.५ इ यांचा अवलंब व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.