मोटरमन केबिनसह रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

142

मागील काही दिवसांपासून लोकलवर दगड फेकण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनेमध्ये प्रवाशांसह मोटरमनही जखमी झाले आहेत. तसेच लोकलच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्याकडील मोबाईल व बॅग लंपास करण्याचेही प्रकार घडले आहेत. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा दलाच्यावतीने रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात सीसीटीव्ही लावल्या जाव्यात अशा प्रकारची मागणी मुलुंडच्या सामाजिक कार्यकर्त्या रसिका मेंगळे यांनी केली आहे.

गाडी पकडण्याच्या नादात अनेक जण होतात जखमी 

मुंबईची लोकसंख्या पाहता लोकल ट्रेन कमी पडत आहेत. मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. परप्रांतातून येणाऱ्या लोंढ्यांमुळे मूळ मुंबईकरांचा लोकल प्रवास हा एका अग्नीदिव्यासारखा झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता नुकताच लोकलच्या डब्यात महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कामधंदा व नोकरी करण्यासाठी महिला व पुरुष वर्ग लोकलने जात असतात. गाडी पकडण्याच्या नादात किंवा अधिक गर्दीमुळे अनेक जखमी होऊन घटनास्थळीच अनेकांचे प्राण गेले आहेत.

(हेही वाचा भारतीय सैन्यही चीनमध्ये घुसखोरी करते; भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य)

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

अशा स्थितीत नुकतीच घडलेली घटना म्हणजे रेल्वे गाड्यांवरील होणारी दगडफेक आहे. ठाण्याच्या पुढे कळवा/मुंब्रा दिशेने असणाऱ्या किंवा रेल्वे लाईन जवळ असणाऱ्या झोपडपट्टीमधील मुले तथा रहिवासी हे रेल्वे लोकलवर दगड भिरकवतात. काही दिवसांपूर्वी रेल्वे गाडीच्या महिला डब्यावर दगडफेक झाली. त्यात महिला प्रवासी जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनवर दगडफेक आणि दारूच्या बॉटल फेकून मारणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ला, टिळक नगर या ठिकाणी ट्रेनवर दगडफेक केल्याच्या तीन घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. दगडफेक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून होत नसून रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांकडून दगडफेक होत असते, असे सामाजिक कार्यकर्त्या रसिका मेंगळे यांनी म्हटले आहे. या झोपडपट्टीची विल्हेवाट लावली पाहिजे. त्यांना एक जागा निश्चित करून दिले पाहिजे. तिथे जागरूक पोलीस पहारा जास्त असावी. म्हणजे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवी, अशी विनंती केली आहे. या दगडफेकीवर आणि रेल्वे परिसरात होणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये बाहेरच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात सीसीटीव्ही लावल्या जाव्यात अशा प्रकारची सूचनाही मेंगळे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.