Delhi Fog : राजधानीत दिवसा धुक्याचे साम्राज्य

देशातील १५ राज्ये थंडी आणि दाट धुक्याच्या विळख्यात आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील.

187
Delhi Fog : राजधानीत दिवसा धुक्याचे साम्राज्य
Delhi Fog : राजधानीत दिवसा धुक्याचे साम्राज्य

राजधानीमध्ये डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा दिल्लीकरांसाठी अतिशय थंड राहिला आहे. अगदी दिवसा देखील दिल्लीतील रस्ते धुक्यात हरविलेले दिसत आहेत. शिवाय धुक्यामुळे राजधानी वासियांना दिवसाही वाहनांचे लाईट लावावे लागत आहे. (Delhi Fog)

देशातील १५ राज्ये थंडी आणि दाट धुक्याच्या विळख्यात आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील. येथे दृश्यमानता श्रेणी ५० मीटर पर्यंत असणे अपेक्षित आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या काही ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात ३१ डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये मंगळवार पासून पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. (Delhi Fog)

(हेही वाचा – Jammu and Kashmir : … तर काश्मीरमध्ये गाझासारखा रक्तपात करू; फारूख अब्दुल्ला यांची दर्पोक्ती)

मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळी ५:३० वाजता पालम, दिल्ली येथे शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आली. कमी दृश्यमानतेमुळे, पालममधील IGI विमानतळावर दिल्लीतील सुमारे ३० उड्डाणे उशीर झाली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ११ फ्लाइट जयपूर आणि एक फ्लाइट लखनऊला वळवण्यात आली. रेल्वेने सांगितले की, धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या १४ गाड्यांना उशीर झाला आहे. (Delhi Fog)

मध्य प्रदेशात दोन दिवस धुक्याचा इशारा आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता गुनामध्ये शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. ग्वाल्हेर, दतिया, भिंड आणि मुरैना येथे दाट धुके होते. येथे दृश्यमानता सुमारे ५० मीटर होती. २६ आणि २७ डिसेंबर रोजी छतरपूर, टिकमगड आणि निवारी जिल्ह्यात २०० ते ५०० मीटरपर्यंत दृश्यमानता असू शकते. हवामान खात्याने हरियाणातील ३१ शहरांमध्ये धुक्याबाबत केशरी आणि पिवळा अलर्ट जारी केला आहे. अंबाला शहरात मंगळवारी शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आली. सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत काही ठिकाणी १० मीटर दृश्यता होती. धुक्यात वाहने रस्त्यावर रेंगाळताना दिसत होती. (Delhi Fog)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.