Delhi Bomb Threat: केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात ‘बॉम्ब’ ठेवल्याचा ईमेल   

केंद्रीय गृहमंत्रालयाला बॉम्बची धमकी. बुधवारी दुपारी ०३ वाजून ३० मिनिटाच्या च्या सुमारास ईमेलमध्ये ही धमकी आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दिल्ली पोलिसांचे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही.

141
Delhi Bomb Threat: केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात ‘बॉम्ब’ ठेवल्याचा ईमेल   

देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी गृह मंत्रालयांची असते. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेले सर्व निर्णय संसदेच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Ministry of Home Affairs) कार्यालयातून घेतले जातात. बुधवारी याच कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी ईमेल द्वारे देण्यात आली होती.  (Delhi Bomb Threat)

(हेही वाचा – काँग्रेस, भाजपाला Election Commission ची नोटीस)

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास ही धमकी ईमेलद्वारे मिळाली. यानंतर तातडीने आवश्यक पावले उचलली गेली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि दिल्ली पोलिसांचे बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले.  (Delhi Bomb Threat)

(हेही वाचा  –  European Nation: पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार ‘हे’ ३ देश, कारण काय ?)

प्राथमिक शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. ही धमकी खोटी (false threat) असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळात प्रशासन अशा धमक्यांना दुर्लक्षित करत नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी, दिल्लीतील शेकडो शाळा आणि अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारे ई-मेलच्या धमक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणू असा मेल करण्यात आला. मात्र, ही धमकी पूर्णपणे पोकळ होती. यात कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.  (Delhi Bomb Threat)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.