Delhi Airport Roof Collapses: दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; गाड्यांचा चक्काचूर

109
Delhi Airport Roof Collapses: दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; गाड्यांचा चक्काचूर
Delhi Airport Roof Collapses: दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; गाड्यांचा चक्काचूर

नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट (Delhi Airport Roof Collapses) म्हणजेच IGI विमानतळावरील टर्मिनल 1 वर मोठा अपघात झाला आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत आणि खांब गाड्यांवर कोसळला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्यचे समजते आहे. (Delhi Airport Roof Collapses)

दिल्ली विमानतळ अंशतः बंद

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अशातच विमानतळावरील अपघाताच्या बातमीने एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे सध्या दिल्ली विमानतळ अंशतः बंद ठेवण्यात आलेलं आहे, दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती प्रावाशांना दिली जात आहे. (Delhi Airport Roof Collapses)

अजूनही काही गाड्या छताखाली

कोसळलेल्या छताच्या मलब्या खालून सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र अजूनही काही गाड्या छताखाली अडकल्या आहेत. सकाळी साडेपाचच्या सुमारास अग्निशमन विभागाला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. (Delhi Airport Roof Collapses)

कारचा अक्षरशः चेंदामेंदा

अपघातानंतर विमानतळावर काय परिस्थिती होती यासंदर्भातील एका व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओवरुन अपघाताची दाहकता सहज लक्षात येते. धातूंच्या मोठमोठ्या खांबांखाली कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या वेगवेगळ्या कारमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशामन दलाने दिली आहे. (Delhi Airport Roof Collapses)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.