Home समाजकारण Dahihandi 2023 : मुंबईत १९५ गोविंदा जखमी, १८ गोविंदा रुग्णालयात दाखल

Dahihandi 2023 : मुंबईत १९५ गोविंदा जखमी, १८ गोविंदा रुग्णालयात दाखल

50
Dahihandi 2023 : मुंबईत १९५ गोविंदा जखमी, १८ गोविंदा रुग्णालयात दाखल

हजार आणि लाखो रुपयांचे बक्षिस जिंकण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या (Dahihandi 2023) उंचच उंच हंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी गोविंदा पडून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. रात्री उशिरा पर्यंत तब्बल १९५ गोविंदा हे किरकोळ तसेच गंभीर मार लागून जायबंदी झाले आहेत. या १९५ जखमी गोविंदांपेंकी केईएम आणि राजावाडी रुग्णालयासह इतर रूग्णालयात १८ जखमी गोविंदांना दाखल करून पुढील उपचार सुरु आहेत. तर १७७ रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत आहे. यात महापालिकेच्या सर्व रुग्णालयात १६५ तर सरकारी रुग्णालयात ३० जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. जे १८ रुग्ण दाखल आहेत त्या सर्वांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू असून त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबईत गुरुवारी गोपाळकाल्याच्या (Dahihandi 2023) दिवशी हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या गोविंदा पथकातील कुणा गोविंदाला दुखापत झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे यासाठी महापालिकेच्या प्रत्येक रुगणालयात प्रत्येकी ५ ते १० रुग्ण खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार केईएम,शीव, नायर, कुपर यासह १६ उपनगरीय रुग्णालय तसेच शासनाच्या जेजे, सेंट जॉर्ज, पोद्दार,जी टी रुग्णालय यासह हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, रहेजा, नानावटी आदी खासगी रुग्णालयांमध्येही खाटा राखीव ठेवून जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

(हेही वाचा – One act competition : संस्कार भारतीतर्फे राष्ट्रीय प्रश्नांवर एकांकिका स्पर्धेचे आयोजन)

त्यानुसार गुरुवारी हंडी फोडण्यासाठी (Dahihandi 2023) मानवी मनोरे रचत उभारलेल्या थर कोसळून काही पथकांमधील जवान जखमी झाले. त्यामुळे या जखमी जवानांना तातडीने जवळच्या महापालिका, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत होते. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण १९५ जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची नोंद झाली आहे. यामध्ये केईएम रुग्णालयात सर्वाधिक ५९ जखमी गोविंदा दाखल झाले. त्यापैंकी ४७ रुग्णांना ओपीडीत उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे, तर १२ गोविंदांना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. तर पूर्व उपनगरातील राजावाडी (Dahihandi 2023) रुग्णालयात १६ जखमी गोविंदा दाखल झाले. पैंकी १४ गोविंदावर उपचार करून सोडून देण्यात आले तर दोन गोविंदांवर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य महापालिका (Dahihandi 2023) रुग्णालयात १२ जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले होते. त्यासर्वांवर ओपीडीमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण १६५ जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यापैकी १४७ गोविंदांवर बाह्यरुग्ण म्हणजे ओपिडी कक्षामध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले. तर १८ गोविंदांवर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. आणि शासनाच्या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३० जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. या सर्व रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण कक्षात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण दाखल झालेल्या १९५ जखमी रुग्णांपैकी सध्या १८ गोविंदांवर महापालिकेच्या केईएम, राजवाडी व इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

उपचार सुर असलेल्या आणि उपचार करून सोडलेल्या गोविंदांची संख्या

केईएम रुग्णालय : एकूण ५९ (१२ दाखल, ४७ उपचार करून सोडले)

शीव रुग्णालय : एकूण १२ ( १२ उपचार करून सोडले)

नायर रुग्णालय : एकूण ०३ ( ० ३ उपचार करून सोडले)

हिंदुजा हॉस्पिटल :एकूण ०१ (उपचार करून सोडले)

जे जे हॉस्पिटल : एकूण ०४(०३ उपचार करून सोडले, )

जीटी रुग्णालय : एकूण ०४( ०४उपचार करून सुरू )

सेंट जॉर्ज : एकूण ०४( उपचार करून सोडले)

पोद्दार रुग्णालय : एकूण १७ ( १७ उपचार करून सोडले)

बॉम्बे हॉस्पिटल : एकूण ०१( उपचार करून सुरू)

व्ही एन देसाई रुग्णालय : एकूण १६ (उपचार करून सोडले)

कुपर रुग्णालय : एकूण १० ( १० उपचार करून सोडले)

राजावाडी रुग्णालय : एकूण १६(२ दाखल, १४उपचार करून सोडले)

वांद्रे भाभा : एकूण ०४ ( ०२ दाखल आणि ०२ उपचार करून सोडले)

जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटर : एकूण२०( सर्वांना उपचार करून सोडले)

कांदिवली शताब्दी रूग्णालय :एकूण ११ ( ०१ दाखल,१० उपचार करून सोडले)

मुलुंड एम टी अगरवाल रूग्णालय : एकूण ०४(सर्वांना उपचार करून सोडले)

वीर सावरकर रूग्णालय: एकूण ०१ (०१ दाखल)

गोवंडी शताब्दी: ( ०८ उपचार करून सोडले)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!