Hawkers Action : दादर व्यापारी संघाने केली महापालिका, पोलिस आयुक्तांकडे ‘ही’ तक्रार

दादर पश्चिम भागांत मागील काही महिन्यांपासून फेरीवाल्यांची संख्या वाढत असून पदपथासह रस्तेही आता या फेरीवाल्यांनी काबिज केल्याने स्थानिकांनी आपली वाहने कुठे उभी करावी अणि लोकांनी चालावे कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

173
Hawkers Action : दादर व्यापारी संघाने केली महापालिका, पोलिस आयुक्तांकडे 'ही' तक्रार
Hawkers Action : दादर व्यापारी संघाने केली महापालिका, पोलिस आयुक्तांकडे 'ही' तक्रार

दादर पश्चिम भागांत मागील काही महिन्यांपासून फेरीवाल्यांची संख्या वाढत असून पदपथासह रस्तेही आता या फेरीवाल्यांनी काबिज केल्याने स्थानिकांनी आपली वाहने कुठे उभी करावी अणि लोकांनी चालावे कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे दादरमधील फेरीवाल्यांनी आधीच पदपथ अडवलीच आहे, त्यावर महापालिकेला आणि पोलिसांना कारवाई करता येत नाही. किमान रस्त्यांवरील तरी फेरीवाल्यांवर कारवाई करून या रस्त्यांवर वाहने उभी करण्यास आणि वाहने जाण्यास तसेच लोकांना चालण्यास रस्ता मोकळा करून द्यावा अशा मागणीच आता दादर व्यापारी संघाने महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे केली आहे. (Hawkers Action)

दादर पश्चिम परिसरात अचानक फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वाढते फेरीवाले हे चक्क जागा अडवून व्यावसाय करत आहे. आधी त्यांनी पदपथ अडवून जागा बळकावल्या आणि आता तर चक्क रस्तेही अडवून त्यावर ते व्यवसाय करु लागल्याने स्थानिकांना आपली वाहने उभी करता येत नाही तसेच रस्त्यावरुन साधी वाहतूकही करता येत नाही. याबाबत दादर व्यापारी संघाने महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन देत या रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Hawkers Action)

तब्बल १२०० हून अधिक सभासद असलेल्या दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह यांनी मागील दहा दिवसांपूर्वीच महापालिका व पोलिस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले असून त्यात त्यांनी या व्यापारी संघाचे ८० टक्के सभासद हा दादरला राहणारे असून या वाढत्या फेरीवाल्यांचा त्यांना त्रास होत असून एकप्रकारे यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच यांच्या उपद्रवामुळे अराजकताही माजलेली आहे,असे या निवेदनात म्हटले आहे. पदपथाच्या बाजुला रस्त्यावर उभी केलेली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतूक पोलिस टोविंग करून नेतात, पण अनधिकृतपणे रस्त्यांवर बसलेल्या फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. (Hawkers Action)

(हेही वाचा – Air pollution : हवा प्रदुषणामुळे वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात)

त्यामुळे पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाई कराल तेव्हा करा, पण आधी रस्त्यांवर बसून व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि जनतेला होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन तात्काळ रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि महापालिकेने जर रस्त्यांवर व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करून दिल्यास दादरमधील रहिवाशांना एकप्रकारे दिलासा मिळेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Hawkers Action)

विशेष म्हणजे युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने रानडे मार्गावर वाहने उभी करण्यास परवानगी दिली गेली. परंतु आता या वाहनतळाला कोणतीही मान्यता नसतील तर वाहनांच्या आड उभे राहून फेरीवाले रस्त्यावर व्यावसाय करतात. तसेच येथील दुचाकीच्या पुढे बसून व्यवसाय करत आहेत. ज्यामुळे दोन्ही बाजुंनी असाच प्रकार सुरु असल्याने लोकांना चालण्यास जागा शिल्लक नसते. साधी गाडीही त्यातून जाऊ शकत नाही. तर दादरमधील छबिलदास गल्लीतील आकाश हॉटेलपासून रस्त्यावरच व्यवसाय केला जात असून डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्गावरही पदपथासह रस्त्यावरही बसून व्यवसाय करत असल्याने हे रस्ते नक्की वाहतुकीसाठी आहेत की फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित होऊ लागला आहे. (Hawkers Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.