Dadar Hawkers Plaza इमारतीची अखेर दुरुस्ती

दादरच्या हॉकर्स प्लाझा मंडईची इमारत ही महापालिकेच्या बाजार विभागाच्या मालकीची असून या इमारतीचे दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते.

143
Dadar Hawkers Plaza इमारतीची अखेर दुरुस्ती

दादरमधील हॉकर्स प्लाझा (Dadar Hawkers Plaza) मंडई इमारतीतील अनेक भागांची दुरुस्तीची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात असून आता या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पाच मजली इमारत ही २५ वर्षांपुर्वीची आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता होती. (Dadar Hawkers Plaza)

दादरच्या हॉकर्स प्लाझा (Dadar Hawkers Plaza) मंडईची इमारत ही महापालिकेच्या बाजार विभागाच्या मालकीची असून या इमारतीचे दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. या स्ट्रक्चरल ऑडीटचय अहवालानुसार या मंडईच्या इमारतीची दुरुस्तीचा निर्णय घेत महापालिकेने निविदा मागवली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मागील निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच स्थायी समिती प्रशासक यांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. (Dadar Hawkers Plaza)

(हेही वाचा – CM Arvind Kejriwal यांच्या घरी ED चे अधिकारी दाखल; केव्हाही होऊ शकते अटक)

या कामांचा समावेश 

या मंडईच्या इमारतीच्या दुरुस्तीमध्ये पॉलीमर मॉडीफाईड मॉर्टर ट्रीटमेंट, मायक्रो कॉन्क्रीट, जॅकेटींग तसेच अंतर्गत तसेच बाहय भागास आवश्यकतेनुसार सिमेंट गिलाव्याची कामे करण्यात येणार आहे. याशिवाय रंगकाम करणे, प्लंबींगची कामे करणे, लादीकरण व पॅव्हरब्लॉकची कामे करणे, दरवाजे व खिडक्यांची कामे करणे, विद्युत कामे व इतर दुरुस्तीची कामे करणे, स्नानगृह व शौचालयांचे जलभेदीकरण व लादीकरण करणे, वाळवी प्रतिबंधक उपाय योजना करणे आदी कामांचा समावेश आहे. या हॉकर्स प्लाझा इमारतीच्या (Dadar Hawkers Plaza) दुरुस्तीसाठी उर्मिल कॉर्पोरेशन कंपनीची निवड करण्यात आली असून विविध करासंह १० कोटी ५८ लाख रुपय खर्च करण्यात येणार आहे. (Dadar Hawkers Plaza)

हॉकर्स प्लाझातील (Dadar Hawkers Plaza) तीन मजल्यांपर्यंत कपड्यांचे व्यापारी असून सुमारे ८०० ते ९०० गाळे यामध्ये आहेत. तसेच वरील दोन मजल्यांवर महापालिकेची कार्यालये बनवण्यात आली आहेत. राज्यात शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नाने सेनापती बापट मार्गावरील फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पुनवर्सन त्याच ठिकाणी हॉकर्स प्लाझाच्या इमारतीत केले होते. (Dadar Hawkers Plaza)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.