CM Arvind Kejriwal यांना अटक; दारू घोटाळ्यातील चौकशीनंतर ED ची कारवाई

ईडीचे तपास अधिकारी जोगेंद्र यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांची चौकशी करत होते. त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.

251

ED च्या पथकाने गुरुवारी, २१ मार्च रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक केली. दारु घोटाळ्यात २ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मुख्यमंत्र्यांवर ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी गुरुवारी संध्याकाळीच ईडी चौकशीसाठी दहावे समन्स घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दिल्ली उच्च न्यायालयातूनही केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही.

(हेही वाचा CM Arvind Kejriwal यांच्या घरी ED चे अधिकारी दाखल; केव्हाही होऊ शकते अटक)

ईडीचे तपास अधिकारी जोगेंद्र यांनी मुख्यमंत्री केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांची चौकशी करत होते. त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. दरम्यान, केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज देखील केजरीवाल यांच्या घराबाहेर पोहोचले आणि त्यांनी सांगितले की, केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा मिळत नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘भाजपची राजकीय टीम (ईडी) केजरीवाल यांच्या विचारसरणीला अटक करू शकत नाही… कारण केवळ आपच भाजपाला रोखू शकते… विचार कधीही दाबता येत नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.