Cyber Attack: ताज हॉटेलच्या समुहावर सायबर हल्ला, १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा हॅकर्सचा दावा

47
Cyber Attack: ताज हॉटेलच्या समुहावर सायबर हल्ला, १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा हॅकर्सचा दावा
Cyber Attack: ताज हॉटेलच्या समुहावर सायबर हल्ला, १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा हॅकर्सचा दावा

ताज हॉटेलच्या समुहावर ५ नोव्हेंबरला झालेल्या सायबर हल्ल्यात हॅकर्सनी (Cyber Attack) ताज हॉटेलच्या सुमारे १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. हा डेटा परत करण्यासाठी हॅकर्सनी ५ हजार डॉलर्स आणि ३ अटीही घातल्या असल्याची माहिती ताज हॉटेल ग्रुपद्वारे समोर आली आहे.

या ग्रपकडून असेही सांगण्यात आले आहे की, या प्रकरणात काळजी करण्यासारखे काही नसून आम्ही याबाबत चौकशी करत आहोत. ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांनाही यासंदर्भातील माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut : स्वातंत्र्यवीर सावरकर हेच खरे हिंदुहृदयसम्राट – संजय राऊत )

सायबर हॅकर्सनी ग्राहकांच्या डेटाच्या बदल्यात ताज हॉटेल ग्रुपकडून ४ लाख रुपये (५ हजार डॉलर) ताज हॉटेलच्या समुहावर ५ नोव्हेंबरला झालेल्या सायबर हल्ल्यात हॅकर्सनी ताज हॉटेलच्या सुमारे १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. हा डेटा परत करण्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. आमच्याकडे या डेटाचे खरे नमुने मागू नयेत, या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी उच्चपदस्थांना आणावे, हॅकर्सनी ५ नोव्हेंबरला १००० कॉलम एन्ट्रीसह डेटा लीक केला होता. ग्राहकांचा पर्सनल नंबर, घराचा पत्ता आणि मेंबरशिप आयडी अशी अनेक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचली असून त्यांच्याकडे २०१४ ते २०२० पर्यंतचा डेटा असल्याचे म्हटले आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, हा डेटा नॉर्मल आहे. यामध्ये काहीही संवेदनशील नाही. कंपनीला आपल्या ग्राहकांच्या डेटाची काळजी आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची चौकशी करत आहोत. सायबर सुरक्षा एजन्सी आणि इंडियन कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम (CERT-In)यांनाही कळवली आहे. ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.