Cryptocurrency : मोठ्या चढ उतारांनंतरही तरुण आणि जेन-झी लोकांचा क्रिप्टोकडेच ओढा

Cryptocurrency : मडरेक्स कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात तरुणांना क्रिप्टोकरन्सी अजूनही भुरळ घातल असल्याचं दिसलं आहे. 

131
Cryptocurrency : मोठ्या चढ उतारांनंतरही तरुण आणि जेन-झी लोकांचा क्रिप्टोकडेच ओढा
  • ऋजुता लुकतुके

क्रिप्टोकरन्सीतील (Cryptocurrency) एक आघाडीचं एक्सचेंज असलेल्या मडरेक्स कंपनीने अलीकडेच क्रिप्टो गुंतवणूकदारांवर एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यात तरुण तसंच जेन-झी लोकांचा ओढा अजूनही क्रिप्टोकडे कायम असल्याचं दिसून आलं आहे. कंपनीने भारतात ८.९७६ लोकांना क्रिप्टोविषयी प्रश्न विचारले. यातील ४५ टक्के लोकांनी क्रिप्टोचा चक्क निवृत्तीसाठीचं नियोजन म्हणून विचार केला होता. (Cryptocurrency)

‘अर्थवर्ष २०२३-२३ – भारतातील क्रिप्टो गुंतवणुकीचा पुनरुज्जीवनाचा काळ’ या नावाने मेडरेक्सने हे सर्वेक्षण प्रसिद्ध केलं आहे. कारण, या सर्वेक्षणानुसार, भारतातील ५० टक्के तरुण आणि जेन-झी क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करतात. येत्या ५ वर्षांत क्रिप्टो हा असेट क्लास गुंतवणुकीच्या बाबतीत मुख्य प्रवाहात येईल, असं या तरुणांना वाटतं. ‘या सर्वेक्षणातून लोकांचा डिजिटल असेट्सकडे वाढलेला कल आणि लोकांच्या बदलत्या गुंतणुकीच्या सवयी समोर येत आहेत,’ असं मडरेक्स जागतिक क्रिप्टो व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष उदुल पटेल यांनी म्हटलं आहे. (Cryptocurrency)

(हेही वाचा – BJP: आता प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड तयार होणार, लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण)

गुंतवणूक तज्ज्ञांनी क्रिप्टोमध्ये जपून गुंतणूक करण्याचाच सल्ला दिला 

जून २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंतच्या कालावधीत हे सर्वेक्षण पार पडलं. या सर्वेक्षणात सहभागी झालेले ८० टक्के लोक हे २० ते ३५ वर्ष वयोगटातील होते. यातील जवळ जवळ सर्वांनी क्रिप्टोत आपली गुंतवणूक असल्याचं सांगितलं आहे. २० ते २५ वयोगटात गुंतवणुकीचं प्रमाण ३५ टक्के आहे. तर २५ ते ३० वयोगटात हे प्रमाण २८ टक्के आहे. ३६ ते ४० वयोगटातील ८ टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. ४० च्या पुढे वय असलेले १० टक्के लोक क्रिप्टोकरन्सीत (Cryptocurrency) गुंतवणूक करतात. (Cryptocurrency)

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण ६९ टक्के तर महिलांचं प्रमाण २९ टक्के होतं. २ टक्के लोकांनी आपलं लिंग उघड केलेलं नाही. या सर्वेक्षणातून समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांच्या आत असलेले लोकही क्रिप्टेकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करतात. अर्थात, गुंतवणूक करताना त्यांना क्रिप्टोमध्ये अंगभूत असलेली मोठी जोखीम ठाऊक आहे की, नाही हा प्रश्नच आहे. कारण, या सर्वेक्षणानंतरही गुंतवणूक तज्ज्ञांनी क्रिप्टोमध्ये जपून गुंतणूक करण्याचाच सल्ला दिला आहे. (Cryptocurrency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.