Covishield Vaccine: कोविशिल्डबाबत कंपनीने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या

211
Covishield Vaccine: कोविशिल्डबाबत कंपनीने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या

कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर अॅस्ट्रॅझेन्का (AstraZeneca) कंपनीने जगभरातील कोविड -19 लस तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने न्यायालयीन कागदपत्रांद्वारे मान्य केले होते की, त्यांनी निर्मिती केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आता कंपनीने म्हटले आहे की, व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून काढून टाकली जात आहे. (covishield vaccine)

कंपनीने सांगितले की, यापुढे या लशीची निर्मिती किंवा विक्री केली जाणार नाही तसेच जगभरातील लसीचा साठा मागवून घेणार, अशी माहिती अॅस्ट्राझेन्का कंपनीने दिली आहे. (Astrazeneca to stop production and sale of covishield vaccine)

अँग्लो-स्वीडिश औषध निर्मात्या कंपनीने न्यायालयाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये यापूर्वी मान्य केले आहे की, लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे यासारखे दुष्परिणाम होतात. लस मागे घेण्याचा फर्मचा अर्ज ५ मार्चला करण्यात आला होता. हा अर्ज ७ मार्चला मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती टेलिग्राफ वृत्तवाहिनीने या लसीबाबत दिली आहे.

(हेही वाचा – Madhya Pradesh: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव)

लसीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी याचिका दाखल
लंडनमध्ये सूचीबद्ध असलेल्या अॅस्ट्रॅझेन्का (AstraZeneca)ने कोविड-19 औषधांच्या विक्रीत घट झाल्यानंतर, गेल्या वर्षी व्हायरस लस आणि लठ्ठपणाच्या औषधांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. AstraZeneca ने कोरोनावर उपचार म्हणून वॅक्सझेव्ह्रिया (Vaxzevria) ही लस निर्माण केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेदेखील या लसीचे उत्पादन घेतले आहे. ही लस भारतात Covishield नावाने विकली गेली. कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ञ पॅनेल तयार करण्याचे निर्देश जारी करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

ॲस्ट्राझेनेकाची माहिती
वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यांनी साथीच्या आजाराच्या काळात लसीकरण मोहिमेमुळे गंभीरपणे अक्षम झालेल्या नागरिकांसाठी लस नुकसानभरपाई प्रणाली स्थापन करण्यासाठी केंद्राला निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती. ”जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी वॅक्सझेव्हरियाने बजावलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. अंदाजानुसार, याच्या वापराच्या पहिल्या वर्षात ६.५ दशलक्षाहून अधिक जीव वाचवले गेले आणि जागतिक स्तरावर ३ अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यापकपणे ओळखला जातो, ” असे ॲस्ट्राझेन्काने म्हटल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.