मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७३८१ रुग्ण, ३५ रुग्णांचा मृत्यू!

70

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या आत नियंत्रणात राखण्यात यश येत असून, सोमवारी दिवसभरात ७२१४ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख खालच्या दिशेने सरकला जात असला, तरी मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे.

अशी आहे आजची स्थिती

मुंबईत सोमवारी दिवसभरात जिथे ७३८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी ७२१४ रुग्ण आढळून आले. तर ९६४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ८३ हजार ९३४ सक्रिय रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात ४५ हजार ३५० रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये २५ पुरुष आणि १० महिला रुग्णांचा समावेश आहे. तर यातील १६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यातील २० रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत.

(हेही वाचाः मुंबईत केवळ १८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आजवरचा सर्वाधिक आकडा! मृत्यूही वाढले)

कंटेन्मेंट झोनची शंभरी पार

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८४ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ४७ दिवसांवर आला आहे व कोविड वाढीचा दर १.४४ टक्क्यांवर आला आहे. जास्त लक्षणे, गंभीर रुग्ण तसेच दीर्घकालीन आजाराच्या रुग्णांवर विविध ठिकाणच्या महापालिका व खाजगी अशा डिसीएच आणि डिसीएचसीमध्ये उपचार केले जात आहेत. याठिकाणी २१ हजार ०९३ रुग्ण दाखल आहेत. याशिवाय आयसीयूमध्ये २७९८ व व्हेंटीलेटरवर १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये सीलबंद इमारतींची संख्या सोमवारपर्यंत ११४१ आहे. पण कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या झोपडपट्ट्या व चाळींची संख्या शंभरी पार झाली आहे. सोमवारपर्यंत ही संख्या १०५ एवढी होती.

दिवसभरात ३९ हजार ५२२ जणांचे लसीकरण

मुंबईत दिवसरात ३९ हजार ५२२ जणांचे लसीकरण पार पडले. त्यामुळे आतापर्यंत एकूण लसीकरणाची संख्या २० लाख ४३ हजार ८९८ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४५ ते ५९ या वयोगटातील १९ हजार ७१६ नागरिकांनी लस घेतली. ६० वर्षांवरील १५ हजार ४० नागरिकांनी दिवसभरात लस घेतली. यातील २४ हजार ४०० जणांनी प्रथमच लस घेतली असून, उर्वरित सर्वांनी दुसरी लस घेतली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.