मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असतानाच आता दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्याच्या दिशेन पुढे सरकत जाताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दीड हजारांच्या आसपास असलेली रुग्णांची संख्या आता पुन्हा निम्म्यावर आली आहे. त्यामुळे सोमवारी ६७६ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
रविवारी मुंबईत जिथे १०६६ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी दिवसभरात ६७६ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात केवळ १७ हजार ८६५ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर दिवसभरात ५ हजार ५७० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सोमवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये २२ हजार ३९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिवसभरात जिथे २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे सोमवारी २९ रुग्णांच्या मृत्यूची नेांद झाली आहे. यामध्ये १७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे असून, यामध्ये १५ पुरुष आणि १४ महिला रुग्णांचा समावेश आहे. ४० वर्षांखाली २ रुग्णांचा समावेश आहे, तर ६० वर्षांवरील १९ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ८ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
३१ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ६७६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५५७०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६६६७९६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९४%एकूण सक्रिय रुग्ण- २२३९०
दुप्पटीचा दर- ४३३ दिवस
कोविड वाढीचा दर ( २४ मे ते ३० मे)- ०.१५ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ४३३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १५८ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ३६ एवढी आहे.
मुंबईत सोमवारी सर्वाधिक लसीकरण
मुंबईत सोमवारी सर्वाधिक लसीकरण पार पडले. यापूर्वी झालेल्या लसीकरणाच्या तुलनेत सोमवारी दिवसभरात ८६ हजार ८८७ जणांचे लसीकरण पार पडले. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ५६ हजार ३६५ एवढे लसीकरण झाले आहे. तर त्याखालोखाल ४५ ते ६० वयोगटातील १९ हजार५४२ नागरीकांचे लसीकरण पार पडले. तर ६० वर्षांवरील ८ हजार ५८८ नागरीकांचे लसीकरण पार पडले.
Join Our WhatsApp Community