जीएसटी करात वाढ; कोस्टल रोडचा खर्च ३३९ कोटींनी वाढला

93
जीएसटी करात वाढ; कोस्टल रोडचा खर्च ३३९ कोटींनी वाढला
जीएसटी करात वाढ; कोस्टल रोडचा खर्च ३३९ कोटींनी वाढला

मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आता जीएसटीच्या वाढीव कराच्या रकमेमुळे प्रकल्प खर्चात तब्बल ३३९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च १२ हजार ७२१ कोटी रुपयांवरून १३ हजार ६० कोटी रुपयांनी वाढला गेला आहे.

मुंबई सागरी किनारा प्रकल्पाच्या कामाला २०१८ पासून सुरुवात केली असून ज्यावेळी महापालिकेने या प्रकल्पाच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली तेव्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) दर १२ टक्के होता. परंतु जुलै २०२२ रोजी जीएसटीचा दरात सहा टक्क्यांनी वाढ होऊन १८ टक्के झाला. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांसाठी नेमलेल्या तिन्ही कंत्राटदारांकडून अतिरिक्त ६ टक्के जीएसटी कराची रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या तिन्ही भागांमधील कामांमध्ये ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात आले. या कामांसाठी जीएसटीच्या दरात वाढ होत असल्याने याबाबतच्या कराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – नाल्यांच्या बांधकामांपासून ते नालेसफाईपर्यंतच्या कामांवर १८ महिला अभियंत्यांचे लक्ष)

या तिन्ही कामांचा प्रकल्प खर्च १२७१.५९ कोटी रुपये असून यावर जीएसटीच्या कराच्या माध्यमातून ३३९.३२ कोटी रुपये आकारण्यात येत असून या तिन्ही प्रकल्पाचा एकूण खर्च आता १३०६०.९१ कोटी रुपये एवढा झाला आहे.

कोस्टल रोड प्रकल्प

  • प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड)
  • बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक ( एचसीसी-एचडीसी)
  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.