१०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण! देशभर ‘असे’ होतेय सेलिब्रेशन!

देशात १०० कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण होताच विमान, जहाजे, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून लाऊडस्पीकरद्वारे याची घोषणा करण्यात आली.

87

कोरोनाचा संसर्ग सुरु होताच भारताने वर्षभरात स्वतःच्या २ लसी निर्माण केल्या आणि वेगात लसीकरणावर भर दिला. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला सुरक्षित करण्याचे आव्हान केंद्र सरकारने स्वीकारले आणि त्यानंतर पुढील दीड वर्षात ते बऱ्याच अंशी केले आहे. या लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गुरुवारी पूर्ण केला आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने जंगी सेलिब्रेशन सुरू केले आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान देणार शुभेच्छा 

यानिमित्ताने दिल्लीत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यानिमित्ताने राम मनोहर लोहिया रुग्णालयात या विशेष कार्यक्रमाला उपस्थित झाले. येथे ते आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशीही बातचीत करणार आहेत. याशिवाय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया कैलास खेर यांनी गायलेले गाणे आणि लाल किल्ल्यावरून ऑडिओ व्हिज्युअल फिल्म लाँच करणार आहेत.

(हेही वाचा : बाळासाहेबांनी घातलेली शपथ उद्धव ठाकरेंनी मोडली! राणेंनी करून दिली ‘ती’ आठवण)

लाऊडस्पीकरद्वारे घोषणा 

देशात १०० कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण होताच विमान, जहाजे, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून लाऊडस्पीकरद्वारे याची घोषणा केली जाईल. या सर्वांव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी केली जात आहे. दिल्ली विमानतळावर एक विशेष प्रकारचे आउटर कवर जारी करणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंहही यावेळी उपस्थित असतील.

लाल किल्ल्यावर जगातील सर्वात उंच झेंडा  

लसीचे १०० कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरही अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर जगातील सर्वात उंच झेंडा फडकावण्यात आला. हा झेंडा २२५ फूट उंच आहे. याची रुंदी आहे तब्बल १५० फूट. या भव्यदिव्य झेंड्याचे वजन आहे १४०० किलो. भारतातील स्वदेशी खादीपासून हाताने विणकाम करून हा झेंडा तयार करण्यात आला आहे. या झेंड्याचे क्षेत्रफळ ३७ हजार ५०० स्क्वेअर फूट एवढे आहे. या झेंड्यासाठी ४६०० मीटर सुती कापडाचा वापर करण्यात आला आहे.

१०० पुरातन वास्तूंवरही फडकला झेंडा 

यानिमित्ताने देशभरात प्रसिद्ध १०० पुरातन वास्तूंवरही भारताचा तिरंगा फडकवण्यात येणार आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ज्या लोकांचे लसीकरण अजूनही बाकी आहे, त्यांनी त्वरित लस घ्यावी आणि देशाच्या या सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावे, असे आवाहन  ट्विट द्वारे केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.