St. George School : सेंट जॉर्ज शाळेची वादग्रस्त शिक्षिका अखेर बडतर्फ; पंतप्रधानांबद्दल केले द्वेषपूर्ण वक्तव्य

1158
St. George School : सेंट जॉर्ज शाळेची वादग्रस्त शिक्षिका अखेर बडतर्फ; पंतप्रधानांबद्दल केले द्वेषपूर्ण वक्तव्य
St. George School : सेंट जॉर्ज शाळेची वादग्रस्त शिक्षिका अखेर बडतर्फ; पंतप्रधानांबद्दल केले द्वेषपूर्ण वक्तव्य

रामायण आणि महाभारत काल्पनिक असल्याचे शिकवणे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद भाषेत लहान मुलांच्या मनात द्वेष निर्माण करणे, असे प्रकार करणाऱ्या कर्नाटकातील शिक्षिकेला अखेर नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. (Hate speech) मंगळुरू येथील कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षिकेच्या विरोधात पालक आणि भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. (St. George School)

(हेही वाचा – Railway Minister Ashwini Vaishnav: वंदे भारत ट्रेनची परदेशात मागणी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती)

रामायण आणि महाभारत काल्पनिक

यासंदर्भातील माहितीनुसार मंगळुरू येथील सेंट जॉर्ज इंग्लिश प्रायमरी स्कूलमधील सिस्टर प्रभा नामक शिक्षिका विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने शिकवित होती. रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे, असे या शिक्षिकेने मुलांना सांगितले. गुजरातच्या गोध्रा येथे 2002 मध्ये झालेली दंगल आणि बिल्कीस बानो बलात्काराचा उल्लेख करत वर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले होते. या संदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर सिस्टर प्रभा मुलांच्या मनात पंतप्रधानांबद्दल द्वेष (Hate speech) निर्माण करीत असल्याचे लक्षात आले.

शाळा व्यवस्थापनाने मागितली माफी

पालकांनी 10 फेब्रुवारी रोजी शाळेपुढे निदर्शने केली. तसेच हे प्रकरण पंतप्रधानांबद्दल अपप्रचाराशी संबंधित असल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी देखील यात उडी घेतली. भाजप आमदार वेदास कामत यांनी पालकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने माफी मागितली. तसेच सदर शिक्षिकेला बडतर्फ करीत असल्याचे जाहीर केले. दरम्यान आरोपी शिक्षिकेच्या विरोधात अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (St. George School)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.