Ashok Chavan यांच्या पक्षत्यागाने महाविकास आघाडीतील काँग्रेसची वाटाघाटीची ताकद घटली

गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्याने, काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला होता. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्याने त्यांची ताकद कमी झाली होती आणि काँग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून आघाडीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र होते.

193

काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी १२ फेब्रुवारीला काँग्रेस सोडताच आज महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटाने पुन्हा २३ लोकसभा (Lok Sabha) जागांचा आग्रह धरायला सुरुवात केली. यावरून काँग्रेसची वाटाघाटी करण्याची क्षमता (bargaining power) तसेच महत्व कमी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ashok Chavan)

भाजपची ताकद वाढली

चव्हाण रविवार ११ फेब्रुवारीपर्यंत (February) महाविकास आघाडीच्या जागावाटापावर होत असलेल्या चर्चेत सहभागी होत होते. सोमवारी १२ फेब्रुवारीला त्यांनी पक्षत्याग केला आणि आज मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने राज्यात भाजपची ताकद (strength) निश्चितच वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला असल्याचे चित्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पहावयास मिळाले. (Ashok Chavan)

उबाठाचा पुन्हा २३ चा नारा

एकीकडे भाजपची ताकद वाढली असतानाच, काँग्रेसची कमी झाल्याचेही दिसून आले. गेले काही आठवडे उबाठाने जागावाटपाच्या चर्चेत सौम्य भूमिका (soft stand) घेतली होती. आज मंगळवारी सकाळी उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना उबाठा २३ जागा लढणार असल्याचा धोशा पुन्हा सुरू केला. (Ashok Chavan)

(हेही वाचा – St. George School : सेंट जॉर्ज शाळेची वादग्रस्त शिक्षिका अखेर बडतर्फ; पंतप्रधानांबद्दल केले द्वेषपूर्ण वक्तव्य)

२५ जागा काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचितला?

गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट (split) पडल्याने, काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्याने त्यांची ताकद कमी झाली होती आणि काँग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून आघाडीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र होते. आता राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांपैकी जर उबाठा २३ जागांवर (म्हणजेच जवळपास ५० टक्के) दावा करणार असेल तर उर्वरित २५ जागा या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तुकड्या-तुकड्याने वाटून घ्याव्या लागणार का? असा सवाल केला जात आहे. (Ashok Chavan)

जागा वाटपावर त्याचा परिणाम

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला रामराम केल्याने पक्ष कमकुवत (weakened) झाल्याचे काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही मान्य केले. राज्यात विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला हा मोठा फटका असून जागा वाटपावर त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता काँग्रेस नेतेदेखील खाजगीत सांगतात. (Ashok Chavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.