Flight Delay Compensation : विमानप्रवासात अडचण आल्यास काय कराल ?

Flight Delay Compensation : प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण काळजी घेण्यास आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध आहेत, असे लेखी उत्तर देण्यात आले आहे.

179
Flight Delay Compensation : विमानप्रवासात अडचण आल्यास काय कराल ?
Flight Delay Compensation : विमानप्रवासात अडचण आल्यास काय कराल ?

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे एक निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. (Flight Delay Compensation) महासंचालनालयाच्या नियमावलीतील ‘प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास किंवा विमान रद्द अथवा विलंबाने आल्यास प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा’ या शीर्षकाअंतर्गत विमान वाहतूक कंपनीने विमान रद्द अथवा विलंबामुळे नुकसान झालेल्या प्रवाशांना आवश्यक ती नुकसानभरपाई किंवा सुविधा देणे अनिवार्य आहे.

विमानप्रवासात अडचण आल्यास काय कराल ?
  • विमान रद्द (Flight Cancellation) झाल्यास, वाहतूक कंपनीला एकत्र पर्यायी विमानात जागा किंवा मग तिकिटाची संपूर्ण रक्कम, नुकसाभरपाईसह अदा करावी लागेल. त्याशिवाय रद्द झालेल्या विमानासाठी विमानतळावर आलेल्या प्रवाशांना पुढच्या विमानापर्यंत जेवण आणि इतर न्याहरी सुविधा द्याव्या लागतील.
  • जर विमानाला विलंब होत असेल, तर वाहतूक कंपनीने भोजन / अल्पोपहार, पर्यायी विमान / तिकिटाची संपूर्ण रक्कम किंवा हॉटेल मध्ये राहण्याची सुविधा अशा सुविधा, विमानाच्या विलंबाचा (Flight Delay) कालावधी लक्षात घेऊन त्यानुसार द्याव्यात, अशी तरतूद आहे.
  • जर अशा काही घटना किंवा परिस्थिती, ज्यावर विमान कंपन्यांचेही नियंत्रण नाही, त्यामुळे विमानाला विलंब अथवा रद्द झाल्यास त्या वेळी प्रवाशांना नुकसान भरपाई देणे, विमान कंपनीसाठी बंधनकारक असणार नाही. (Flight Delay Compensation)
  • विमानाच्या वेळापत्रकात बिघाडाबद्दलची माहिती जर आधीच सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल, तरीही बाधित प्रवाशांना सुविधा द्याव्या लागतील. त्या सुविधा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर, CARS, तसेच DGCA website वर प्रवाशांसाठीची नियमावली म्हणून उपलब्ध आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण काळजी घेण्यास आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आधीच उपलब्ध आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री (Union Minister of State for Civil Transport) जनरल (सेवा नि.) डॉ. वी के.सिंह (V K. Singh) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला हे लिखित उत्तर दिले. (Flight Delay Compensation)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.