CM Relief Fund Cell : शिबिरात एकाच दिवशी २,००० रुग्णांनी घेतला विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ

51
CM Relief Fund Cell : शिबिरात एकाच दिवशी २,००० रुग्णांनी घेतला विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ
  • प्रतिनिधी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने ठाणे येथील एम. एच. हायस्कूल परिसरात आयोजित भव्य आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एकाच दिवशी तब्बल २,००० नागरिकांनी विनामूल्य वैद्यकीय सेवांचा लाभ घेतल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. (CM Relief Fund Cell)

आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात २९५ वैद्यकीय कर्मचारी, ज्यात डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट यांचा समावेश होता, तसेच १०० स्वयंसेवकांनी समर्पितपणे सेवा दिली. हृदयरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा (ईएनटी), बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग, सामान्य वैद्यकीय सेवा, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशा विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून दिले. (CM Relief Fund Cell)

(हेही वाचा – पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारे दुष्ट राष्ट्र; भारताचे United Nations परिषदेत खडे बोल)

शिबिरात ईएनटी आणि नेत्ररोग विभागातील सेवांना रुग्णांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञांच्या तपासणीनंतर २१२ रुग्णांना पुढील उपचारासाठी उच्च दर्जाच्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात दोन रुग्णवाहिका तैनात होत्या, तसेच रक्त तपासणी, लघवी तपासणी, ईसीजी चाचणी आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी या सुविधाही पूर्णपणे मोफत देण्यात आल्या. काही रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात आल्या, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला. (CM Relief Fund Cell)

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना सातत्याने मदत करत आहे. दर्जेदार वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे ठाणे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांचा लाभ मिळाला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सुरू राहणार आहे. (CM Relief Fund Cell)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.