Eknath Shinde : पलावावासियांना मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत खा. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पलावा या वसाहतीतील रहिवाशांना करात ६६ टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

184
Eknath Shinde : पलावावासियांना मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट
Eknath Shinde : पलावावासियांना मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत खा. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पलावा या वसाहतीतील रहिवाशांना करात ६६ टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खा. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २६ हजार सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली आहे. यावेळी इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. (Eknath Shinde)

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, भाजपा कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे, एमआयडीसी प्राधिकरण आयुक्त डॉ. विपिन शर्मा, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्यासमवेत संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी आणि शिवसेना, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Project Kush : इस्रायलसारखे अभेद्य सुरक्षाकवच आता भारतही बनवणार )

पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प असल्याने त्याचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. येथील सदनिकाधारकांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २६ हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने व कायमस्वरुपी सोडविण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याअंतर्गत या भागात असलेल्या नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून अधिक दाबाने मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, अधिकचे बूस्टर पंप बसविणे, नळजोडण्यांचा व्यास दुप्पट करणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात याव्या. (Eknath Shinde)

पाणी वितरण व्यवस्था उभारण्यासाठी सविस्तर नियोजन आराखडा तयार करत त्यांची तातडीने त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराचा ऐतिहासिक ठेवा जपणे महत्वाचे असल्याने सध्या मंदिर परिसराची सुमारे ६ एकर जागा एमआयडीसी प्राधिकरणाच्या नावे आहे. ही जागा मंदिर देवस्थानाच्या नावे करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबत आज सकारात्मक चर्चा घडून आली असून जागा लवकरच हस्तांतर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. याच बरोबर कल्याण डोंबिवली येथील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडून आली. (Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.