Muslim : चौथी इयत्तेत मुस्लिम विद्यार्थ्याने हिंदू विद्यार्थ्यावर ब्लेडने केले वार; तक्रार केल्यावर हिंदू मुलाला मुस्लिम पालकाकडून मारहाण

301
गुजरातमधील वडोदरा येथील एका शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि त्यात एका मुस्लिम (Muslim) विद्यार्थ्याने एका हिंदू विद्यार्थ्यावर ब्लेडने वार केले. एवढेच नाही तर याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने त्याच्या मित्रांसह मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता ब्लेडने वार करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्याचे पालक शाळेत आले आणि त्यांनी वर्गात घुसून तक्रार करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यालाही मारहाण केली.

पीडित विद्यार्थ्याची बाजू घेणाऱ्या मित्रांनाही बेदम मारहाण

ही घटना वडोदरातील नागरवाडा भागात असलेल्या जीवन साधना शाळेत घडली. या शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुस्लिम (Muslim) विद्यार्थ्याने एका हिंदू विद्यार्थ्याला सामान्य वादातून ब्लेडने जखमी केले होते. या घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता ब्लेडचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावण्यात आले. मात्र, पालकांनी येऊन पीडित मुलाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पीडित विद्यार्थ्याची बाजू घेणाऱ्या त्याच्या मित्रांना त्यांच्यासमोरच बेदम मारहाण केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.