CIBIL Score : तुमची नोकरीही ठरवते तुमचा सिबिल स्कोअर?

CIBIL Score : नोकरीच्या स्टेटसचा सिबिल स्कोअरवर कसा परिणाम होतो पाहूया. 

138
CIBIL Score : तुमची नोकरीही ठरवते तुमचा सिबिल स्कोअर?
  • ऋजुता लुकतुके

तुम्ही श्रीमंत असलात म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) चांगलाच असेल अशी खात्री देता येत नाही. आणि तुम्ही गरीब असाल म्हणजे स्कोअर खराबच असणार असंही नाही. किंवा तुम्ही चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत आहात म्हटल्यावर तो झपकन वाढत नाही. आणि तुम्ही बेकार झालात म्हणून तो पटकन कमी होत नाही. पण हां. तुम्ही वेळेत कर्जाचे हफ्ते भरू शकता की नाही, हे मात्र नक्की पाहिलं जातं. आणि त्यावरूनच तुमचा सिबिल स्कोअर ठरत असतो. मग सिबिल स्कोअरवर परिणाम करणारे घटक ते नेमके कोणते? त्यावर एक नजर टाकूया, (CIBIL Score)

नोकरीतील स्थिरता –

इथं उत्पन्नाच्या स्त्रोतातील स्थिरता अपेक्षित आहे. कारण, बँक कर्ज देताना कारण, कर्जाची परतफेड करण्याची क्षमता तपासून पाहत असतात. आणि त्यासाठी कुठल्या स्त्रोतातून तुम्हाला पैसे मिळतायत. आणि त्यात नियमितता आहे ना, हे त्यांना पाहायचं असतं. (CIBIL Score)

परतफेडीची क्षमता –

इथं परतफेड आणि ती ही वेळेत अपेक्षित आहे. कारण, वेळेवर हफ्ते भरले जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पगारदार व्यक्ती वेळेत हफ्ता भरु शकेल, असं बँकेचं गृहितक असतं. ठरावीक तारखेला व्यक्तीच्या बँक खात्यातून हफ्ता भरला जाणार असतो. ही सोय बँकेसाठीही सोयीची असते. त्यामुळे तुम्हाला नियमित पगार असेल तर तुमची कर्ज फेडण्याची क्षमता जास्त आहे, असं समजून क्रेडिट रेटिंग एजन्सी तुमचा सिबिल स्कोअरही स्थिर ठेवतात. बेरोजगार व्यक्तीचा सिबिल स्कोअरही खराब होऊ शकतो. (CIBIL Score)

कर्जाला मंजुरी –

बँकेकडे कर्ज मागायला गेलात की, त्याला मंजुरी मिळणं हे पहिलं पाऊल आहे. आणि नोकरी स्थिर असेल तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचा कर्जाचा अर्ज लगेच मान्य करू शकतात. अर्थात, यात खासकरून गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज अशा नेहमीच्या कर्जांचा विचार केला आहे. उद्योगधंद्यासाठीचं कर्ज आणि इतर कर्जांच्या बाबतीत बँकांचे निकष अर्थात वेगळे असतील. (CIBIL Score)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तेलंगणात भाजपा-काँग्रेस आक्रमक, बीआरएसपुढे अस्तित्वाचा प्रश्न)

क्रेडिटचा वापर –

पगारदार व्यक्तीला क्रेडिट कार्ड मिळायलाही अडचणी येत नाहीत. यालाच क्रेडिट युटिलायझेशन असं म्हणतात. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे तुमची पत असली पाहिजे. तरंच तुम्हाला क्रेडिट कार्ड, काही प्रकारची वैयक्तिक कर्ज फारसा त्रास न होता मिळवता येतील. (CIBIL Score)

क्रेडिटची मर्यादा व कर्जाची रक्कम –

तुम्हाला नेमकं किती कर्ज द्यायचं किंवा तुमच्या क्रेडिट कार्डाची मर्यादा किती असावी याचा निर्णयही बँक तुमची नोकरी, त्यातील स्थिरता आणि परतफेडीची क्षमता पाहून घेत असते. इथं तुमचा पगार उपयोगी पडतो. तो जितका जास्त असेल तुम्हाला कर्जाची मोठी रक्कम मिळू शकेल. त्यामुळे सिबिल स्कोअर (CIBIL Score) चांगला ठेवायचा असेल तर नियमित उत्पन्नाचा स्त्रोत, परतफेडीची क्षमता आणि वेळेवर हफ्ते भरण्याची सवय या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. (CIBIL Score)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.