Earthquake : चीन भूकंपाने हादरला; १२६ इमारती कोसळल्या

115
Turkey Earthquake: तुर्की शहरात भूकंपाचा धक्का, कोणतीही जीवितहानी नाही

चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. इमारती कोसळल्या. अनेकजण जखमी झाले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी सकाळी लोक झोपले असताना भूकंप झाला. लोक गाढ झोपेत होते. भूकंपाचा केंद्रबिंदू देझोऊ येथे होता. केंद्राची खोली फक्त 10 किलोमीटर होती. 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. तर 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बीजिंगपासून 300 किलोमीटर अंतरावर होता. चीनी भूकंप नेटवर्क केंद्रांचे म्हणणे आहे की भूकंपाची तीव्रता 5.5 होती, परंतु अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने रिश्टर स्केलवर 5.4 तीव्रता दिली आहे. चीनी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत. इमारती, बाउंड्री वॉल कोसळल्याने डेब्रिज रस्त्यावर पसरले होते. अंधारात जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक या ढिगाऱ्यांवर आदळले आणि पडून जखमी झाले. शहरात बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.भूकंपाची तीव्रता पाहून गाड्या थांबवण्यात आल्या. रेल्वे ट्रॅकची पाहणी केली जात आहे. त्याचा परिणाम रस्त्यांवरही झाला आहे.

(हेही वाचा Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही)

भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होता. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाचे म्हणणे आहे की, हे केंद्र पृष्ठभागापासून फार खोल नव्हते. अशा स्थितीत आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. धोक्यामुळे गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. पाइपलाइनच्या तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. अनेक भागात पाइपलाइन खराब झाली आहे.भारतात जाणवले भूकंपाचे धक्के भारताची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून चंदीगड-पंजाबपर्यंतच्या लोकांना हा धक्का बसला. अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळीही 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जूनपासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 12 लहान-मोठे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जूनमध्ये डोडा येथेही भूकंपाचे अनेक धक्के जाणवले होते. 13 जून रोजी 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता ज्यामध्ये डझनभर घरांचे नुकसान झाले होते. अफगाणिस्तानात दररोज भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुर्की-सीरिया सीमा भागात 7.8 स्केलच्या भूकंपाने मोठा विध्वंस केला होता. तुर्कीच्या भूकंपात 59000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.