Tiger : वाघाच्या कातडीची तस्करी करणारे छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात

166
प्रातनिधीक छायाचित्र

छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्हा वन विभागाने 6 जुलैला बिजापूर येथे वाघाच्या कातडीची तस्करी करताना काही लोकांना अटक केली. या घटनेच्या तपास करीत असताना बीजापूर वन विभागाने यात सहभागी असलेल्या वीस जणांना अटक केली. ही वाघाची कातडी कुठून आणली यावर सविस्तर तपास केला असता, पकडण्यात आलेल्या आरोपींकडून ही कातडी महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातून बॉर्डर वरून आणल्याचे आरोपींनी कबूल दिली आणि विजापूर पोलिसांनी या घटनेच्या सखोल तपास केला असता गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून या घटनेची माहिती जिल्ह्यातील वन विभागाला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे अनेक जनावरे वन्य प्राणी हे नवेगाव नागझिरा वाघ्र प्रकल्पामध्ये राहत असतात आणि गोंदिया जिल्ह्यातील जंगला बरोबर मध्य प्रदेश जंगलामध्ये यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असतो. याचा फायदा घेत अनेक प्राण्यांची शिकार करत त्यांची तस्करी करणारी टोळी ही गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशाच एका टोळीने सालेकसा जंगलातून एका वाघाची शिकार केली. त्या वाघाची कातडी नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील सीआरपीएफच्या सब इन्स्पेक्टर आणि त्यांच्या 20 सहकाऱ्यांना कातडी विकली. याबाबत विजापूर वन विभागाने कारवाई करत सब इन्स्पेक्टर आणि यांच्यासह वीस जणांना या गुन्हामध्ये आरोपी करून त्यांना अटक केली आहे. याविषयी त्यांनी सविस्तर तपास केला असता ही वाघाची कातडी सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलातून या वाघाची शिकार करून ही कातडी विकली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्य आरोपी शालिक मरकाम वय 55 वर्ष कोसाटोला, मुरुमार, सुरज मरकाम वय 45 वर्ष कोसाटोला, मुरपार, जियाराम मरकाम, नवाटोला सालेकसा या तिघांनी मिळून वाघाला करंट लावून मारले असल्याचे कबूल केले आहे. तसेच घटनास्थळावरून वाघाच्या हाडाचे तुकडे मिळाले. असल्याचे छत्तीसगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वाघाची नख आणि मिशीचे केस विक्री करणे असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे, या तिघांना वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपींमध्ये गेदलाल भोयर वय 55 वर्ष लभानधारणी, तुकाराम बघेले वय 59 वर्ष भाडीपार, अंगराज कटरे वय 67 वर्ष दरबडा, वामन फुंडे वय 60 वर्ष सिंधीटोला, या चार आरोपींना सालेकसा तालुक्यात अटक करण्यात आली. तसेच या विक्री कामांमध्ये मदत करणारे आमगाव येथील शामराव शिवनकर व 53 वर्ष, रेल्वेमध्ये नोकरी करणारे जितेंद्र पंडित, नालंदा बिहार सध्या मु. आमगाव, यादवराव पंधरे बोदरा जि. भंडारा, अशोक खोटेले वय 50 वर्ष गुदमा गोंदिया अशा अकरा लोकांना वन विभाग बीजापूर येथील वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या सर्वांना विजापूर छत्तीसगड येथे नेण्यात आले आहे. अनेक वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात वाघाची शिकार होत असल्याचे पहावयास मिळत आहे. तरी मात्र, गोंदिया जिल्ह्यातील वनविभाग आजही झोपेत असून ही वाघाची शिकार गोंदिया जिल्ह्यातून केव्हा थांबेल आणि वन विभागाला या वन्य प्राण्यांच्या बाबतीत केव्हा जाग येईल ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा Khalistani : लंडनमध्येही खलिस्तानींचा भारतीय उच्चायुक्तालयाला टार्गेट करण्याचा प्रयत्न)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.