Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं.

126
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात (Chhatrapati Sambhaji Nagar Fire) कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ महिला, २ पुरुष, २ लहान मुलांचा समावेश आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

(हेही वाचा  – Pune : राज्यात २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ )

अग्निशामक दलातील जवान जखमी
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला याविषयी सांगितले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेईपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता. हे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. या घटनेत एका अग्निशामक दलातील जवान जखमी झाला.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ लोक होते. पहिल्या मजल्यावर ७ लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर ७ लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर २ लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.