Sudhir Mungantiwar : ताडोबाच्या जंगलात ७ जटायू पक्षांना सोडणार

श्रीराम जन्मभूमी येथे अयोध्येत रामरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या पार्श्वभूमीवर रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात जटायु पक्षांना सोडणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

196
Sudhir Mungantiwar : ताडोबाच्या जंगलात मुक्त करणार ७ जटायू पक्षी
Sudhir Mungantiwar : ताडोबाच्या जंगलात मुक्त करणार ७ जटायू पक्षी

श्रीराम जन्मभूमी येथे अयोध्येत रामरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या पार्श्वभूमीवर रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा (Tadoba) जंगलातील झरी परिसरात जटायू पक्षांना सोडणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाकडून २१ आणि २२ ला आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर येथे केले गेले आहे. (Sudhir Mungantiwar)

श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना चंद्रपूर (Chandrapur) शहर आणि जिल्हा देखील तयारीला लागला असून २१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता झरी येथे ७ जटायू (Jatayu) पक्षांना सोडणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून २१ आणि २२ ला आकर्षक कार्यक्रम आहेत. सुप्रसिद्द अभिनेता पुनित इस्सर (महाभारतातील दुर्योधन) यांच्या रामायण या नाटकाचा प्रयोग दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हे नाटक अति भव्य स्वरूपाचे असून यामध्ये ५० पेक्षा जास्त कलाकार काम करत आहेत. रामायणातील (Ramayana) अनेक महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित हे नाटक आहे. मुख्यतः राम आणि रावण यांच्यामधील संवाद व संघर्ष यामध्ये ठळकपणे दिसून येतो. (Sudhir Mungantiwar)

(हेही वाचा – UBT : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार रश्मी ठाकरे)

हे होणार कार्यक्रम 

आगामी २२ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे हे दीडशे ते २०० कलाकारांना घेऊन रामायण संबंधित सादरीकरणे करणार आहेत. यामध्ये नृत्य, नाट्य, गीत गायन, वादन यांचा समावेश असणार आहे. गदिमा व बाबूजी यांच्या अविष्कारातून साकार झालेल्या गीत रामायण मधील काही गाणी व त्यावर आधारित सादरीकरणे ही यावेळेस अनुभवता येणार आहे. प्रभू रामाशी संदर्भातील गाणी आणि गीत रामायणातील काही महत्त्वाची गीते घेऊन व रामायणातील काही प्रसंगावर आधारित प्रसंग सादरीकरण होणार आहे. (Sudhir Mungantiwar)

या कार्यक्रमाची सुरुवात राम जन्म अर्थात पाळणा गीताने होईल तर शेवट राम अयोध्यात परतल्यानंतर झालेला जल्लोष आणि राज्याभिषेक दाखवण्यात येईल. याच कार्यक्रमांमध्ये अनुराधा पॉल या विख्यात महिला तबलावादक व त्यांचा चमू रामायणातील काही प्रसंगावर गीत सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता जिल्हा व महानगर भाजपाच्या वतीने २२ जानेवारी रोजी “फायर शो” ने होणार असून या सर्व कार्यक्रमात चंद्रपूरच्या नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. (Sudhir Mungantiwar)

हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=kqwtNkGT-OQ&t=2s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.