UBT : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार रश्मी ठाकरे

265

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी राजकीय पक्ष रणनीती ठरवत आहेत. उबाठाचे (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनीही लोकसभेच्या मतदारसंघांची बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे उतरणार आहेत.

रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार, 16 जानेवारी रोजी ही यात्रा विदर्भापासून सुरु होणार आहे. त्यावेळी विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल. पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, राजूल पटेल, शितल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर संपूर्ण विदर्भातील विधानसभेचा सखोल आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाची (UBT) स्त्रीशक्ती संवाद यात्रा विदर्भातून सुरू होणार आहे.

(हेही वाचा CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातून विक्रमी तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक करार होणार?)

कोणाशी संवाद साधणार? 

राज्यात सध्या अंगणावाडी सेविकांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला आघाडीकडून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि इतर महिलांशी संवाद संबंधित विषयांवर भाष्य या संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून केले जाणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती, यवतमाळ वाशिम, रामटेक लोकसभा मतदारसंघात या महिला आघाडीकडून दौरा केला जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.