Cervical Cancer Vaccine Free: ८ कोटी मुलींना सर्व्हायकल कर्करोगाची लस मोफत देणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाची घोषणा

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ६ कोटी डोस प्रदान केल्यानंतर केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू करणार आहे.

191
Cervical Cancer Vaccine Free: ८ कोटी मुलींना सर्व्हायकल कर्करोगाची लस मोफत देणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाची घोषणा
Cervical Cancer Vaccine Free: ८ कोटी मुलींना सर्व्हायकल कर्करोगाची लस मोफत देणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाची घोषणा

सर्व्हायकल कर्करोग (Cervical Cancer Vaccine Free) रोखण्यासाठी केंद्र सरकारने ८ कोटी महिलांना या व्हायरलशी लढण्यासाठी मोफत लस देण्याचा निर्णय मोदी सरकारने गुरुवारी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये ही लस दिली जाणार आहे. देशात सर्व्हायकल कर्करोगामुळे वर्षाला ७५ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यावर मोदी सरकारने गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्पात (budget session) महत्त्वाची घोषणा केली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ६ कोटी डोस प्रदान केल्यानंतर केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. ९ ते १४ वर्षांतील मोफत लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Newborn Baby Dumping In Mumbai: मुंबईत नवजात अर्भकाला फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ, एका महिन्यात सहा घटना)

सर्व्हायकल कर्करोगाची कारणे – 

HPV म्हणजे ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’मुळे महिलांना सर्व्हायकल कर्करोग होतो. शरीर संबंधांवेळी संक्रमित पुरुषाच्या संपर्कात आल्यास या व्हायरसची लागण होते.
– एकापेक्षा अधिक पुरुषांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता असते.
– ५ वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणे, धूम्रपान या गोष्टींमुळे महिलांना सर्व्हायकल कर्करोगाचा धोका जास्त असतो.
– सर्व्हायकल कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी नियमितपणे पॅप चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.