Central Railway : मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात; केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यास मोटरमनचा विरोध का ?

64
Central Railway : मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात; मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यास का आहे विरोध
Central Railway : मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात; मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यास का आहे विरोध

सिग्नल तोडणे, वेगावर नियंत्रण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. (Central Railway) सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने २ लोकल ट्रेनमध्ये सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टम (SILAS) आणि अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) लावण्यात आली आहे. या प्रणाली लोकल ट्रेन चालवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत. या प्रकल्पाच्या यशामुळे त्यांचा हळूहळू सर्व लोकल गाड्यांचा विस्तार होणार आहे. यावरून मध्य रेल्वेचे मोटरमन आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या सीसीटीव्हीवरून दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लक्ष विचलित होणार असल्याची तक्रार मोटरमन्सने केली आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येईल, असा दावा मोटरमन्सने केली आहे.

या निर्णयाविरोधात सीएसएमटीमध्ये मोटरमन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची बैठक पार पडली. मध्य रेल्वेने मोटरमन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी मागितला आहे. परंतु, तेव्हापर्यत मोटरमननी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने मोटरमनला केल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने दिली आहे.

मोटरमनला मार्गदर्शन द्यायचे असल्यास एका लोकलमध्ये २ मोटरमन ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव मागे न घेतल्यास अनंत चतुर्दशीनंतर आंदोलन केले जाईल, अशी भूमिका मध्य रेल्वेच्या मजदूर संघाकडून घेण्यात आली आहे. (Central Railway)

(हेही वाचा – Manipur : मणिपूर प्रशासन चालवण्याचा हेतू नाही; का संतापले सर्वोच्च न्यायालय)

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असला, तरी काही मोटरमननी त्यांच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ मुंबई विभागाचे अध्यक्ष विवेक सिसोदिया म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर्सवर दबाव येऊ शकतो. त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या मोटरमनच्या बैठकीत गणेशोत्सवानंतर आंदोलन केले जाईल, अशी भूमिका सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने घेतली आहे. (Central Railway)

लोकल ट्रेनमध्ये एसआयएलएएस आणि एडीएएसची अंमलबजावणी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संभाव्य धोक्यांची आधीच माहिती देऊन अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ही प्रणाली आणली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सिस्टीममध्ये मोटरमन कामावर नजर ठेवण्यासाठी केबिनमध्ये आणि सिग्नल यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी बाहेरच्या बाजूला कॅमेरा लावण्यात येणार आहे. मोटरमन्सच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवून, रेल्वेला सिग्नल जंपिंग आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंगच्या घटना कमी करण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. हा निर्णय 2016-2017 मध्ये रेल्वे बोर्डाने स्थापन केलेल्या सुरक्षा समितीच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे. सिग्नल जंपिंग आणि रुळावरून घसरणे यासह मोटरमनद्वारे मोबाइल फोन वापरण्यासारख्या घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. (Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.