Central Railway Sold Scrap : मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून केली ‘इतकी’ कमाई !

21
Central Railway Sold Scrap : मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून केली 'इतकी' कमाई !
Central Railway Sold Scrap : मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून केली 'इतकी' कमाई !

मध्य रेल्वेने कालबाह्य इंजिन, डिझेलवर धावणारे इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघातात नुकसान झालेले इंजिन / डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. (Central Railway Sold Scrap) मध्य रेल्वेने १ एप्रिलपासून ३१ ऑगस्टपर्यंत १५०.८१ कोटी रुपयांची भंगाराची विक्री केली आहे. या मोहिमेअंतर्गत माटुंगा आगारातील २७.१२ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्यात आली.

(हेही वाचा – Central Railway : कल्याण रेल्वे यार्डातील लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या नूतनीकरण प्रकल्प प्रगतीपथावर)

मुंबई विभागातील २५.९७ कोटी रुपये, भुसावळ विभागातील २२.२५ कोटी रुपये, पुणे विभागातील १६.०८ कोटी रुपये, भुसावळच्या विद्युत इंजिन आगारातील १६.०५ कोटी रुपये, सोलापूर विभागातील ११.३६ कोटी रुपये, नागपूर विभागातील १०.०७ कोटी रुपये, मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणच्या विभागांतील एकत्रित २१.९१ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्यात आली. (Central Railway Sold Scrap)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग भंगारमुक्त करण्यासाठी ‘शून्य भंगार मोहीम’ साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.या मोहिमेअंतर्गत एप्रिल–ऑगस्ट २०२३ या कालावधीत भंगार विक्रीतून १५०.८१ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षात ३०० कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत ३७.१० टक्क्यांनी भंगार विक्रीत वाढ झाली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नको असलेले ६,०८६ मेट्रिक टन रूळ, ९ लोकोमोटिव्ह, १६० डबे आणि ६१ वाघिणी (वॅगन्स) यांची भंगारात विक्री करण्यात आली.आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान, मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून ४८३.२९ कोटी महसूल मिळविले. हा भंगार महसूल २०२२- २३ पर्यंतच्या ३८८.८० कोटींच्या आनुपातिक विक्री उद्दिष्टापेक्षा ३६. १४ टक्के जास्त आहे.

भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूल मिळवण्यातच मदत झाली नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. मध्य रेल्वे आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी चिन्हांकित केलेल्या सर्व भंगार साहित्याची विक्री करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. (Central Railway Sold Scrap)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.