CBDC : भारतात लवकरच डिजिटल रुपया होणार लॉन्च? RBI ने केली घोषणा

नऊ बँकांची निवड

21
CBDC : भारतात लवकरच डिजिटल रुपया होणार लॉन्च? RBI ने केली घोषणा
CBDC : भारतात लवकरच डिजिटल रुपया होणार लॉन्च? RBI ने केली घोषणा

देशात डिजिटल रुपयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करेल,” अजय कुमार चौधरी यांनी जी 20 शिखर परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, १९३४ च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा : G-20 Summit : 26 वर्षांपूर्वी स्थापन झालेला G-20 बनला G-21,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) बाजारात जसजसे वाढत जाईल, तसतशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना डिजिटल सुरक्षेवर काम करावे लागेल.कारण आता ज्या प्रकारे सायबर गुन्हे घडत आहेत, त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेचे सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कसारख्या समस्यांना तोंड देण्याचे आव्हानही रिझर्व्ह बँकेसमोर असणार आहे.

या नऊ बँकांची निवड
RBI ने सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.