Bus Accident : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

93
Bus Accident : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांच्या (Bus Accident) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर रात्री १२ वाजेच्या सुमारास एका खासगी बसचा (Bus Accident) भीषण अपघात झाला. पूजा ट्रव्हल्सच्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पूलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाली असून ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. एम एच 40 सी 6969 ही बस पुण्याहून नागपूरकडे जात होती.

(हेही वाचा – Monsoon Update : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात? जाणून घ्या काय हवामान खात्याचा अंदाज)

छत्रपती संभाजीनग ते जालना महामार्गावर बदनापूर येथे ही घटना घडली. या महामार्गावर (Bus Accident) मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली.

या अपघाताची (Bus Accident) माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.