Breast Cancer : केईएम रुग्णालयात स्तनाच्या कर्करोगाचे निदान कक्ष

29
Breast Cancer : केईएम रुग्णालयात स्तनाच्या कर्करोगाचे निदान कक्ष
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

सध्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer) प्रमाण वाढत असल्याने या रोगाचे निदान करण्यासाठी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रकल्प राबवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या स्माईल कौन्सिल या बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या निरामई हेल्थ ऍनॅलिटीक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ६७०० महिला रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

महापालिकेच्या स्माईल कौन्सिलच्या सध्याच्या तुकडीमध्ये निरामई हेल्थ ऍनॅलिटीक्स प्रायव्हेट लिमिटेड या इनक्यूबेटीचा समावेश करण्यात आला आहे. या नवउद्दमी निरामई या संस्थेने स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण विरहित आणि लक्षण असलेल्या स्त्रियांमध्ये निदान करण्यासाठी संशोधन करून नाविन्य पूर्ण प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. ही प्रक्रिया किरणोत्सार रहित, संपर्क असून ती अनाक्रमक पध्दतीची आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेतील रुग्णालयात येणाऱ्या स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer) वेळीच निदान करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar यांना मविआच्या कोणत्या नेत्याने दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर ?)

महापालिकेतील केईएम रुग्णालयातील प्रोफेसर अँड युनिट चीफ, डिपार्टमेंट ऑफ जन्म यांनी या प्रकल्पात एकूण ६७०० स्त्रियांची तपासणी करण्याचे प्रस्तावित केले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निरामई हेल्थ ऍनॅलिटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी य प्रकल्पांमध्ये ६७०० स्त्रियांची तपासणी करण्याचे प्रस्ताविले असल्याने या तपासणीचा खर्च सुमारे ६७ लाख रुपये आणि प्रकल्प व्यवस्थापन खर्च ४३ लाख रुपये आणि अंमलबजावणी खर्च १ कोटी ३८ लाख ३५ हजार रुपये अशाप्रकारे एकूण सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

याबाबत केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) रुग्णांवर केईएम रुग्णालयात ओपीडी अंतर्गत जनरल वॉर्डात उपचार केले जायचे. परंतु आता यासाठी एक स्वतंत्र युनिट तयार करून देण्यात आले आहे. ओपीडीअमध्ये आलेल्या रुग्णांना तिथे वर्ग करून या स्वतंत्र युनिटमध्ये उपचार केले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. या कक्षामध्ये आठ खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.