
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेत आजवर केवळ जेवणावळीची व्यवस्था पाहणारे ठक्कर केटरर्स आता रस्त्यावर महत्त्वाच्या कार्यक्रमांसह पाहुण्यांच्या आगमन प्रसंगी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बॅरेकेट्सच तसेच पडदे लावण्याच्या कामातही हातभार लावणार आहे. मुंबईतील कुलाबा ते ग्रॅंटरोड भायखळा दरम्यान होणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या भेटीगाठी आणि सार्वजनिक शिबिरांच्या ठिकाणी या ठक्कर केटरर्स कंपनीला पडदे लावणे तसेच बॅरेकेट्सच लावण्यासाठी निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (BMC)
(हेही वाचा – अखेर Donald Trump यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; नेतान्याहू यांचे प्रयत्न)
मुंबई महापालिकेच्या कुलाबा ते भायखळा दरम्याने परिमंडळ एक मध्ये विविध विभागांमध्ये आयोजित होणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगी तसेच कार्यक्रमांकरता मास्किंग व फेन्सिंगच्या वार्षिक कामांसाठी ठक्कर केटरर्स यांची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका ही विभाग स्तरावर विध प्रसंगी तथा कार्यक्रमांसाठी वर्षभर विविध प्रकारच्या उपाययोजनाचे तथा व्यवस्थेचे आयोजन करत असते. तसेच महापालिका ही विभाग स्तरावर विविध सार्वजनिक शिबिरेही आयोजित करत असते. त्याकरता वर्षभराकरता एकसमान व्यवस्था म्हणून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी गर्दी नियंत्रणासाठी मास्किंग आणि फेंन्सिंगची व्यवस्था असावी, या उद्देशाने एकाच कंत्राटदाराची नेमणूक वर्षभरासाठी करण्यात आली आहे. (BMC)
(हेही वाचा – विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांकडे Mahavikas Aghadi ची धाव)
या एकच कंपनीला नियुक्त केले गेल्याने यापूर्वी प्रत्येक कामांसाठी स्वतंत्र ई कोटेशन मागवून दिल्या जाणाऱ्या कामांसाठी कमी अधिक पैसे जात होते. हा पैसा अधिक खर्च होऊ नये आणि एकच पद्धतीचा अवलंब व्हावा याचसाठी याचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांचा म्हणणे आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी ठक्कर डेकोरटर्स आणि युनिटी हॉस्पिटलीची वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये ठक्कर डेकोरेटर्स ही कंपनी पात्र ठरल्याने या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
