BMC : पवार यांची बदली, सोपवली सहआयुक्त (विशेष) ची जबाबदारी

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त (सुधार) रमेश पवार यांची अखेर बदली करण्यात आली असून या पदाचा भार उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सह आयुक्त रमेश पवार यांच्या बदलीची चर्चा जोरात वाहू लागले होते.

2340
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे
BMC Schools : महापालिकेच्या शाळांमध्ये बसवणार ३६५४ जेलफोम फायर स्प्रेची अग्निशमन उपकरणे

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त (सुधार) रमेश पवार (Ramesh Pawar) यांची अखेर बदली करण्यात आली असून या पदाचा भार उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सह आयुक्त रमेश पवार यांच्या बदलीची चर्चा जोरात वाहू लागले होते. पवार यांच्याकडील सुधार विभागाच्या पदभार काढून घेत त्यांच्याकडे अन्य विभागाचा पदभार सोपवण्याचा निर्णय प्रशासनाच्या स्तरावर घेण्यात आला होता. मात्र, पवार हे ०१ एप्रिल २०२४ मध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांची बदली आता अन्य पदावर करणे योग्य ठरणार नाही, अशा प्रकारच्या युक्तिवाद काही ज्येष्ठ सह आयुक्त आणि उपायुक्त यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्यानंतर या बदलीच्या हालचाली काही प्रमाणात थांबल्या होत्या. मात्र अखेर त्यांच्याकडील सुधार विभागाचा पदभार काढून घेत कबरे यांच्याकडे या विभागाचा भार सोपवण्यात आला आहे. (BMC)

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) हे महविकास आघाडीच्या काळात नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त झाले होते. पण राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर त्यांना नाशिक महापालिका आयुक्त पदावरून हटवून पुन्हा महापालिकेत आणले होते. पण महापालिकेत आल्यावर त्यांना महत्त्वाच्या विभाग तथा खात्यांचा कारभार रहाणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण पवार (Ramesh Pawar) यांच्याकडे सुधार विभागाचा भार सोपवण्यात आला होता. पण आता त्यांच्याकडील सुधार विभागाचा भार काढून घेत उपायुक्त विशेष संजोग कबरे यांच्याकडे सोपवला आहे, आणि कबरे यांच्याकडील सह आयुक्त (विशेष) पदाचा भार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (BMC)

(हेही वाचा – Narendra Modi: भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल, पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन)

उपायुक्त कबरे यांच्याकडे १५ दिवसांपूर्वी घनकचरा विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता, तो भार कायम राखत सुधार विभागाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या बदलीची हालचाल सुरू झाल्यानंतर पवार हे वैद्यकिय करणासाठी सुट्टीवर गेले होते, त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कारभार हा प्रभारी उपायुक्त (वित्त) यांच्याकडे सोपवला होता. पवार यांच्याकडील भार उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याकडे सोपवण्यात येणार होता. पण त्यांच्याऐवजी आता संजोग कबरे यांचे नाव निश्चित करून बदलीची अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.