BMC : आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ, प्रत्येक बचत गटाला महानगरपालिका देणार एक लाख रुपये

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे.

1170
BMC : आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ, प्रत्येक बचत गटाला महानगरपालिका देणार एक लाख रुपये
BMC : आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ, प्रत्येक बचत गटाला महानगरपालिका देणार एक लाख रुपये
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिका ही महिला बचत गटांच्या माध्यमातून मुंबई महानगरातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करीत आहेत. गृहउद्योगांच्या माध्यमातून मुंबईतील लाखो महिला आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. शुभारंभ झालेल्या आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेद्वारे प्रत्येक बचत गटाला महानगरपालिका एक लाख रुपये देणार आहे, असा उपक्रम राबविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने बळकटी दिली आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. महानगरपालिकेनेही महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. यापैकी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी १५ मार्च २०२४ रोजी कळ दाबून वरळी स्थित एनएससीआय डोम येथे शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही महिला बचत गटांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासह तब्बल ७० हजार आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) अनुदान जमा करण्यात आले. तसेच दिव्यांग स्वयंरोजगार योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांनाही अनुदान वाटप करण्यात आले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभेत महाराष्ट्रात कोण मारणार बाजी ? ओपिनियन पोल काय सांगतात…)

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनी यशवंत जाधव, आमदार मनिषा कायंदे, बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शाह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, (उप आयुक्त परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त जयदीप मोरे, संतोषकुमार धोंडे, गजानन बेल्लाळे, चक्रपाणी अल्ले आदींसह महानगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते. (BMC)

मुंबई महानगरात महिला सुरक्षा अभियान राबवणार

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात. या महिलांना ज्याप्रमाणे आपण रोजगार देतो, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देण्याची जाबाबदारी देखील आपली आहे. त्यामुळे मुंबई महानगरात महिला सुरक्षा अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिस यांनी एकत्रित येत अभियान राबवावे, असेही नमूद केले.

नारीशक्ती बाहुंमध्ये बळ

प्रत्येक महिला तिच्या कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे ती स्वत:च्या पायावर उभी रहायला हवी. ती आत्मनिर्भर झाली तर घर, गाव, शहर आणि देश आपोआपच आत्मनिर्भर होणार. यामुळे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र शासन सदैव तत्पर आहे. याच प्रयत्नांमुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. कोणतेही काम पूर्ण करण्याचा निर्धार केला तर महिला मागे हटत नाहीत. याच नारीशक्ती बाहुंमध्ये बळ भरून देशाच्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. (BMC)

(हेही वाचा – Indian Navy: भारतीय नौदलाकडून सोमालियाच्या किनाऱ्यावरील बांगलादेशी जहाजाची सुटका)

योजनेतून मिळणारा धनलाभ हा थेट महिलांच्या बँक खात्यात

महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रमांमध्ये केवळ महिलाच नव्हे तर दिव्यांग, तृतीयपंथी या सर्वांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासिका, महिलांसाठी वसतिगृह या सुविधा देखील खूप महत्वपूर्ण आहेत. आकांक्षित महिला योजनेतून मिळणारा धनलाभ हा थेट महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. महिला शक्तीचे जे अभूतपूर्व दर्शन आज झाले आहे त्याला मी वंदन करतो आणि हा भाऊ या सर्व भगिनींच्या पाठीशी सदैव उभा आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगतातून दिली. (BMC)

मुंबईतील महिला अधिकाधिक सक्षम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत विविध योजना अंमलात आणतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील महिला अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा अवतार ? सभेच्या टीजरमधून काँग्रेसकडून महाराजांचा घोर अपमान)

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला कौशल्य विभाग’

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, बचत गटातील महिलांच्या कष्टाला कौशल्याची जोड देणे काळाजी गरज आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण मुंबई महानगरात किमान कौशल्य विभागामार्फत ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला कौशल्य विभाग’ सुरू करण्यात येणार आहे. या विभागात महिन्यातील तीन दिवस बचत गटांच्या महिला सदस्यांसाठी विपणन आणि प्रसिद्धीचे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येणार असल्याचे लोढा यांनी यावेळी जाहीर केले. (BMC)

केवळ महिलाच नव्हे तर…

महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रास्ताविकात घेतला. केवळ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी यांनाही नियोजन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या परिघात आणल्याचे सुधाकर शिंदे यांनी सांगितले. तसेच सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात आपण दिव्यांग व्यक्तींकरिता ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ १ एप्रिल २०२४ पासून सुरू करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.