BMC : किरण दिघावकर आणि विश्वास मोटे यांच्यावर उपायुक्तपदाची जबाबदारी

विशेष म्हणजे किरण दिघावकर हे मालाड पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असून उपायुक्त विशेष यांचे कार्यालय हे महापालिका मुख्यालयात आहे. त्यामुळे दिघावकर यांना मालाड पी उत्तर विभाग आणि महापालिका मुख्यालय असे कामकाज करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.

3393
Ravli Hill : रावळी टेकडीवरील महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता अधिक मजबूत

मुंबई महापालिकेचे (BMC) सहआयुक्त रमेश पवार आणि रणजित ढाकणे हे येत्या १ एप्रिल २०२४ रोजी सेवा निवृत्त होत असल्याने या रिक्त पदाची जबाबदारी सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि विश्वास मोटे यांच्यावर अतिरिक्त कामकाज म्हणून सोपवण्यात आले आहे. दिघावकर हे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असून त्यांच्याकडे उपायुक्त (विशेष) पदाचा तर विश्वास मोटे हे एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त असून त्यांच्याकडे उपायुक्त (परिमंडळ ३)च्या अतिरिक्त कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या (BMC) तीन सहायक आयुक्तांना लवकरच उपायुक्तपदी बढती मिळणार असून यामध्ये किरण दिघावकर, विश्वास मोटे आणि संतोष धोंडे यांच्या नावाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सहआयुक्त पदावरील अधिकारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी या अधिकाऱ्यांना क्रमवारीनुसार उपायुक्तपदी बढती दिली जाणार आहे. त्यानुसार आता सहआयुक्त (विशेष) रमेश पवार व सहआयुक्त रणजित ढाकणे (परिमंडळ ३) हे नियत वयोमानानुसार १ एप्रिल २०२४पासून सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या दोन्ही सहआयुक्तांकडील पदांचा भार इतर उपायुक्तांकडे सोपवण्यासाठी महापालिकेच्या सामान्य विभागाच्यावतीने आदेश बजावण्यात आले आहे. (BMC)

(हेही वाचा – Savitri Jindal: भाजपामध्ये सामील होऊन पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करणार – सावित्री जिंदाल)

१ एप्रिलपासून या दोन्ही सहायक आयुक्तांकडे उपायुक्तपदाचा कार्यभार

त्यामुळे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याकडे त्यांच्याकडील पदाच्या कामकाजाव्यतिरिक्त रमेश पवार यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या उपायुक्त (विशेष)पदाचा आणि एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याकडे त्यांच्याकडील पदाच्या कामकाजाव्यतिरिक्त रणजित ढाकणे यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या उपायुक्त (परिमंडळ ३) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून या दोन्ही सहायक आयुक्तांकडे उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. (BMC)

विशेष म्हणजे किरण दिघावकर हे मालाड पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असून उपायुक्त विशेष यांचे कार्यालय हे महापालिका (BMC) मुख्यालयात आहे. त्यामुळे दिघावकर यांना मालाड पी उत्तर विभाग आणि महापालिका मुख्यालय असे कामकाज करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. तर विश्वास मोटे हे चेंबूर एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त असून त्यांच्याकडे उपायुक्त परिमंडळ ३ची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याने चेंबूर ते अंधेरी पूर्व येथील के पूर्व विभाग कार्यालय अशाप्रकारे तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.