Bhayandar Fire : भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, काही जण जखमी

आझाद नगर झोपडपट्टी परिसरात लागलेली आग अतिशय भीषण असून अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे.

126
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या (Bhayandar Fire) घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आज म्हणजेच बुधवार २८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भाईंदर येथील आझादनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली.

(हेही वाचा – Ravindra Jain: भजन गायन ते बॉलिवुडमध्ये संगीतकार !)

आगीच कारण अद्याप अस्पष्ट :

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत ही आग (Bhayandar Fire) लागली आहे. अचानक लागलेल्या या आगीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहीती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : इंग्लिश संघ बंगळुरू आणि चंदिगडमध्ये घालवणार सुट्टी)

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु :

भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर (Bhayandar Fire) झोपडपट्टीत काही झोपड्यांना अचानक आग लागली आणि ही आग वेगाने पसरली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईत आग (Bhayandar Fire) लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ठाण्यातील अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंड परिसरातील झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागली होती. घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.