Ravindra Jain: भजन गायन ते बॉलिवुडमध्ये संगीतकार !

जैन यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक हिट चित्रपटांसाठी संगीत देऊन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

356
Ravindra Jain: भजन गायन ते बॉलिवुडमध्ये संगीतकार !
Ravindra Jain: भजन गायन ते बॉलिवुडमध्ये संगीतकार !
रविंद्र जैन हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या (Ravindra Jain) दशकातलं मोठं नाव. मोठे केस, डोळ्यांवर गॉगल असे त्यांचे रुप. सौदागर, चितचोर असे सुपरहिट चित्रपट असो किंवा रामायण, श्रीकृष्ण असा मालिका असो – रविंद्र जैन हे नाव असलंच पाहिजे. कलेतील योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रवींद्र जैन यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी अलिगढ येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंडित इंद्रमणी जैन आणि आईचे नाव किरण जैन. ते जैन समाजाचा होते. त्यांचे वडील संस्कृत पंडित होते आणि आई गृहिणी होती. त्यांच्या वडिलांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना संगीत शिकण्यासाठी जी.एल. जैन, जनार्दन शर्मा आणि नथू राम यांसारख्या दिग्गजांकडे पाठवले. तरुण वयातच त्यांनी मंदिरात भजने गायला सुरुवात केली.
जैन यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक हिट चित्रपटांसाठी संगीत देऊन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. चोर मचाये शोर, गीत गाता चल, चितचोर, अखियों के झरोखों से, नदिया के पार, राम तेरी गंगा मैली आणि विवाह असे चांगले चित्रपट त्यांना सुदैवाने मिळाले. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेलाही त्यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णा, अलिफ लैला, जय वीर हनुमान, जय हनुमान, साई बाबा, जय मा दुर्गा, जय महालाक्ष्मी अशा अनेक मालिकांना संगीतबद्दह त्यांनी केले आहे.
त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि १९८५ मध्ये राम तेरी गंगा मैली मधील त्यांच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर रवींद्र जैन यांना संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.