भंडारा जिल्हा (Bhandara District) नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असुन या ठिकाणी नवेगाव नागझिरा अभयारण्य आहे. (Bhandara Nagzira Wildlife) पण आता याचं अभयारण्यात पर्यटकांनी पाट फिरविली असून स्थानिकांचा रोजगार हिरावला जात आहे. मे महिना सुरु असून उन्हाळ्यात पर्यटक जंगल सफारी करून आनंद लुटतात. साकोली तालुक्यातील पिटेझरी गेट (PITESSARY GATE) वर एकेकाळी पर्यटकांची गर्दी मावेनासी झाली होती. पण आता येथील वाघ सुट्टीवर गेल्यामुळे वाघोंबांचे दर्शन दुर्लभ झाले असल्याने आता पर्यटकांनी देखील पाठ फिरविली आहे.
(हेही वाचा – Water Supply : मुंबईकरांना मोठा दिलासा; पाणीपुरवठा १०० दशलक्ष लिटरने वाढला)
जंगलाचा राजा जणू सुट्टीवर गेल्याने स्थानिकांचा रोजगार देखील हिरावला आहे. वन विभागाच्या (Forest Department) नियोजन शून्य असल्याने जंगलात चाऱ्याचा अभाव त्यात तीव्र उन्हाळा म्हणुन तृण भक्षी प्राणी गावाकडे धाव घेत आहे. त्यांच्या मागावर असलेले वाघ देखील रिझर्व जंगल सोडून जात आहे. आता जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. की अभयारण्यापेक्षा गावासेजारी वाघ दिसू लागले आहे.
तर या संदर्भात स्थानिक आमदार व काँग्रेस नेते यांनी सुद्धा खेद व्यक्त केला आहे. नवेगाव नागझिरा अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी अधिकाऱ्यांना या आधी देखील सूचना दिल्या आहे. राज्यात चालणारे सरकार पंगू असून सरकारमधील बसणारे अधिकारी कुरण ( चारा) खात आहेत. त्यामुळें याकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे आता वनविभागाने या कडे लक्ष देउन पर्यटन कस वाढविता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Bhandara Nagzira Wildlife)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community