Best Strike : सलग दुसऱ्या दिवशी ‘बेस्ट’ विस्कळीत; बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

सध्या बेस्टमध्ये एकूण नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहे

118
Best Strike : सलग दुसऱ्या दिवशी 'बेस्ट' विस्कळीत; बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच

आज म्हणजेच गुरुवार ३ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मुंबईची ‘बेस्ट’ (Best Strike) बस वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बेस्ट कर्मचारी संपावर

पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप (Best Strike) पुकारला आहे. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे.

(हेही वाचा – Online Gaming वरील २८ टक्के जीएसटी राहणार कायम)

… तोपर्यंत हा संप सुरुच राहणार

पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी (Best Strike) मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

नऊ हजार कंत्राटी कर्मचारी संपावर

मिळालेल्या माहितीनुसार सध्या बेस्टमध्ये एकूण नऊ हजार कंत्राटी कर्मचारी (Best Strike) आहे. हे नऊ हजार कर्मचारी संपावर असल्याचा दावा कंत्राटी कर्मचारी संस्थेने केला आहे. यामध्ये एसएमटी एटीपीएल असोसिएटचे दोन हजार कंत्राटी कर्मचारी, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे तीन हजार कंत्राटी कर्मचारी, हंसा ग्रुपचे दीड हजार, टीएमएल ग्रुपचे दोन हजार, ओलेक्ट्रा ग्रुपचे 500 इतके खाजगी कंत्राटी कर्मचारी आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.