BEST : ‘बेस्ट’ला मोठे आर्थिक नुकसान; दोन लाख प्रवासी घटले

नवीन एसी बसला विलंब असणे, बस गाड्यांची कमी झालेली संख्या, दहिसरपर्यंत मेट्रोचा पर्याय आणि मिडी इलेक्ट्रीक बसची कमी प्रवासी संख्या ही आहेत. 

157
'बेस्ट'ला मोठे आर्थिक नुकसान
'बेस्ट'ला मोठे आर्थिक नुकसान
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे बस, ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहनांनवर वाढणारा ताण. मागच्या वर्षांत मात्र तब्बल ३५ लाख प्रवाशांनी मुंबईतील बेस्ट BEST बसमधून प्रवास केला होता. मात्र काही कारणांमुळे या वर्षात ही संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे.

संख्या कमी झाली कारण…

प्रत्येक बसमधून प्रत्येक दिवशी १,००० हून अधिक मुंबईकर प्रवास करतात. म्हणजेच बसच्या प्रत्येक फेरीतून ५८ यात्री प्रवास करतात. शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज नवे विक्रम रचत आहे. तरीही BESTच्या प्रवाशांची संख्या मागच्या काही महिन्यांत कमी झाली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये नवीन एसी बसला विलंब असणे, बस गाड्यांची कमी झालेली संख्या, दहिसरपर्यंत मेट्रोचा पर्याय आणि मिडी इलेक्ट्रीक बसची कमी प्रवासी संख्या ही आहेत.

बस गाड्यांची संख्या

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ मध्ये ३,३०० बस गाड्या होत्या. २०२२ मध्ये यात वाढ होऊन ती संख्या ३,६३८ झाली होती. २०२३ मध्ये यातील १५० बस कालबाह्य झाल्यामुळे काढून टाकण्यात आल्या होत्या. सध्या बेस्टकडे BEST स्वमालकीच्या १,६४६ तर भाडेतत्वावरील १,५८२ बस गाड्या उपलब्ध आहेत.

१० हजार बसचे उद्दीष्ट

प्रवासी संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवास अधिकाधिक सुकर करण्यासाठी बेस्टने वातानुकूलित आणि मोठ्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला होतो. त्यानुसार २००० सिंगल डेकर एसी आणि ९०० डबल डेकर एसी बस दाखल करण्यात येणार होत्या. मात्र आतापर्यंत एकही सिंगल डेकर एसी दाखल करण्यात आली नसून फक्त २ डबल डेकर बस ताफ्यात आल्या आहेत. २०२७ पर्यंत १० हजार बस ताफ्यात दाखल करण्याचे बेस्टचे उद्दीष्ट आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.