Sharad Pawar : चार दिवसांच्या राजीनामा नाट्यावर पडला पडदा; राष्ट्रवादीची ‘पॉवर’ पवारांच्याच हातात

माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपल्या प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो, असे शरद पवार म्हणाले.

127

२ मे रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. मात्र राज्यभर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यामुळे अखेर पवार यांनी यावर फेर निर्णय घेण्यासाठी २-३ दिवसांची मुदत मागितली, तसेच यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. समितीने एक मुखाने शरद पवार हेच अध्यक्ष राहावे, असा ठराव केला. त्यानंतर शुक्रवार, ५ मे रोजी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण निर्णय मागे घेत असून पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारत आहे, असे जाहीर केले. अशा प्रकारे या राजीनामा नाट्यावर अखेर ४ दिवसांनी पडदा पडला असून पक्षाची पॉवर शरद पवारांच्याच हातात राहणार आहे.

काय म्हणाले शरद पवार?

२ मे रोजी मी एनसीपीच्या अध्यक्षपदापासून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता, सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या समाजसेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी भूमिका होती, मात्र जनमाणसांमध्ये तीव्र भावना होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहीनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले, त्याच बरोबर देशभरातून आणि महाराष्ट्रातून निरनिराळ्या राजकीय पक्षातील नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझा सांगाती हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपल्या प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय, या सर्वांचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदावर राहण्याच्या विनंतीचा मान राखून मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत आहे. मात्र तरीही उत्तराधिकारी नेमणे गरजेचे आहे, या विचारावर मी ठाम आहे. नवीन नेतृत्व निर्माण करणे यासंदर्भात सहकाऱ्यांचा विचार घेऊन नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवे नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन. यश-अपयश आणि सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करताना आपण माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल आभार. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहे, असे शरद पवार Sharad Pawar म्हणाले.

(हेही वाचा The Kerala Story चित्रपटाबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.